जीएसटी वसुलीत महाराष्ट्राचा टॉप गिअर; आठ महिन्यात घसघशीत महसूल, काय सांगते आकडेवारी?

Khozmaster
1 Min Read

कोल्हापूर : देशाच्या महसूल उत्पन्नात अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या ‘जीएसटी’च्या वसुलीत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ महिन्यांत तब्बल अठरा टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर अखेर राज्यात २ लाख ११ हजार ५६३ कोटी रुपयांची वसुली झाल्याने राज्याला निधी रूपाने मोठी गंगाजळी मिळण्याची अपेक्षा आहे.

देशात महसूल वाढीसाठी जीएसटी ही करप्रणाली सुरू करण्यात आली. तेव्हापासून त्याच्या वसुलीत राज्याने समाधानकारक कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिनाही जीएसटी महसुलासाठी चांगला ठरला. यंदा संकलनात चांगली वाढ असून, नोव्हेंबरमध्ये २५,५८५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षी हा आकडा २१,६११ कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर यंदा नोव्हेंबर महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा जीएसटी महसुलात ३९७४ कोटी रुपयांची म्हणजे १८ टक्के वाढ झाली आहे.गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतल्यास एप्रिल ते नोव्हेंबरचा महसूल दोन लाख ११ हजार ५६३ कोटी रुपये इतका झाला. मागील वर्षी हे संकलन एक लाख ७८ हजार ४७१ कोटी रुपये होते. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांत जीएसटी महसुलात ३३,०९२ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. राज्यात चांगला महसूल वसूल झाल्याने केंद्राकडून अधिक गंगाजळी मिळण्याची अपेक्षा आहे.नोव्हेंबरपर्यंत आकडेवारी (कोटी रुपयांमध्ये)
वर्ष २०२२-२३ २०२३-२४
महाराष्ट्र १,७८,४७१ २,११,५६३
देश ११,९०,९१९ १३,३२,४३९

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *