कोल्हापूर : अपुरी प्रवास संख्या असल्याने कोल्हापूर-तिरुपती (Kolhapur-Tirupati Flight) ही थेट सेवा सुरू ठेवण्यास विमान कंपनीने (Airline Company) असमर्थता दर्शवली. त्यामुळे विमान प्राधिकरणाने त्यांना हैदराबादमार्गे तिरुपती सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे आता कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती अशी विमानसेवा आज (ता. १५) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाने दिली. तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर प्रवाशांची संख्या सातत्याने अपुरी असल्याचे विमान कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे ही सेवा व्यवहार्य नसून ती बंद करणार असल्याचे विमान कंपनीने विमानतळ प्राधिकरणाला कळवले.तसेच शुक्रवार (ता. १५) पासून ही सेवा बंद होणार असल्याचे निश्चित झाले. मात्र, कोल्हापुरातील भाविकांची सोय लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने हैदराबादला जाणारे विमान पुढे तिरुपतीला न्यावे, अशी विनंती कंपनीला केली. त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती अशी विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी जरी वाढणार असला तरी विमानसेवा सुरू राहाणार आहे.
Users Today : 8