विदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र ठरले अव्वल – उदय सामंत

Khozmaster
2 Min Read

Nagpur News: केंद्र सरकारने एफडीआयची यादी गुरुवारी जाहीर केली. गत महिन्यात २८ हजार ८३८ कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात केली. राज्य विदेशी गुंतवणूक आणण्यात देशात पुन्हा एक नंबर अर्थात अव्वल ठरले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा सुरू होती. शेकापचे जयंत पाटील, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, प्रवीण पोटे यांनी या अल्पवयीन चर्चेत सहभाग नोंदवीत सूचना मांडल्या होत्या. या चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी ही माहिती दिली. रायगडमधील प्रस्तावित तसेच सध्या सुरू असलेल्या नैना व इतर प्रकल्पातील स्थानिकांचे काही प्रश्न असतील तर बैठक घेऊन त्यांचा संभ्रम दूर करण्यात येईल.

सेझमधील ७५ टक्के जमीन ही खासगी तर उर्वरित २५ टक्के जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन करून घेतली आहे. खासगी जमिनीचे काय करायचे, त्यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बैठक घेतील.

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत देण्याचे निर्देश दिले जातील. उदालीच्या ४० एकरात स्वित्झर्लंडची कंपनी १०० कोटीचा आयुर्वेदिक कारखाना सुरू करणार आहे. हापूस आंबा प्रक्रिया उद्योगासाठी २०० एकर जमीन अधिग्रहित केली आहे.

प्रकल्प येताना राजकारण होऊ नये, राजकारण बाजूला ठेवून उद्योजकाला आपल्याकडे बोलावले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार निर्मितीबरोबरच उद्योजक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या १५ महिन्यांत त्याची संख्या १३ हजार ५०० झाली आहे. कोकणात परफ्यूम, मॅंगोपार्क असे विविध उद्योग येत आहेत. तसेच विश्वकर्मा योजना लोकांच्या घरापर्यंत गेली पाहिजे, यासाठी एक चळवळ म्हणून राबविणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सामंत यांनी सांगितले.

काय म्हणाले मंत्री…

  • रायगडमध्ये विविध प्रकल्पांत ३५ हजार कोटीची गुंतवणूक
  • करमोळी येथे तब्बल ५०० कोटी खर्चून देशात सर्वात मोठे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र
  • तर नागपूर, अमरावतीसह राज्याच्या सर्व जिल्ह्यात ५० कोटी खर्च करून स्किल सेंटर सुरू करणार.
  • एका छत्राखाली परवानगी मिळावी या हेतूने १५ जिल्ह्यात उद्योग भवन बांधणार आहे.
  • नैना प्रकल्पात स्थानिकांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन.

    गडचिरोलीची उद्योगनगरी म्हणून ओळख

    गडचिरोली जिल्ह्याकडे नजर वळविताना सारे नक्षग्रस्त म्हणून बघतात. मात्र येत्या काळात याच गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आहेत. लवकरच लॉईड कंपनी येत असून स्थानिकांना येथे नोकरीच्या संधी आहेत.यामुळे या जिल्ह्याची ओळख उद्योगनगरी अशी होणार आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

0 9 3 8 7 2
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *