Nagpur News : ‘महादेव ॲप”सारख्या ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सोबतच तारेतारकांना जुगाराच्या जाहिराती करू नये, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ मुस्ताकिन याच्यासोबत अमित शर्मा नावाचा आरोपीची भागिदारी आहे. त्यांचा पैसा विजय जैन याने जे.पी. इन्फ्रा या बांधकाम कंपनीत गुंतवण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.
यावर गृहमंत्री म्हणून उत्तर देताना फडणवीस यांनी महादेव ॲपची चौकशी ईडीमार्फत केली जात असल्याचे सांगितले. याशिवाय आरोपींचा हेतूसुद्धा जाणून घेण्यात येणार आहे. ऑनलाइन बेटिंग विदेशातून चालते. त्याच्यावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करीत आहे. भविष्यात सायबर क्राईम वाढतच जाणार आहे.
त्यामुळे राज्यात सायबर सेक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केले जात आहे. त्यात सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश केला जाणार आहे. याकरिता निविदा मागवण्यात आल्या आहेत. एकूण १७ कंपन्यांनी याकरिता स्वारस्य दाखवले आहे. आरोपींनी जुगारासाठी कितीही नव्या वाटा शोधल्या तरी त्या बंद केल्या जातील, असाही दावा फडणवीस यांनी केला.
Users Today : 8