धायरी परिसरात खळबळ! कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

Khozmaster
1 Min Read

धायरी फाटा येथील सणस शाळे जवळील मुख्य रस्त्यावर कचऱ्यात  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवजात मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, स्थानिकांच्या मदतीने अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी आठच्या  सुमारास  सणस शाळे शेजारील कचराकुंडी जवळ नवजात अर्भक दिसले होते. अशी माहिती पुणे मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले आहे.हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो .आजूबाजूला मोठी वस्ती आहे. याच वस्तीतील एखाद्या मातेने अर्भक फेकून दिले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहे.

0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *