सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालया जवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यासंदर्भात
कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी या बैठकीस खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, रेल्वे विभागाचे सहाय्यक विभागीय अभियंता सरोजकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पोलीस, वाहतूक व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी, दूरदृष्य प्रणालीद्वारे रेल्वेचे विभागीय अभियंता विकासकुमार उपस्थित होते.
यावेळी सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालया जवळील रेल्वे पूल मार्गाची रेल्वे विभागाने कालमर्यादा निश्चित करून सर्वप्राथम्याने तात्काळ दुरूस्ती करावी. ही दुरूस्ती हलकी व अवजड वाहतूक करण्यायोग्य असावी. तसेच, सदर मार्गावरील नवीन पुलाचे बांधकाम करताना रेल्वे विभागाने सहा पदरी मार्ग करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी येथे दिले.