भाजपा नेते हेमंत रासने यांच्या माध्यमातून पुणे श्रमिक पत्रकार संघात “अटल संवाद.

Khozmaster
1 Min Read

श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते हेमंत रासने यांच्या माध्यमातून पुणे श्रमिक पत्रकार संघात “अटल संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वर्गीय अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केले. तसेच,अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही अटलजींची जीवनशैली होती‌. प्रत्येकाशी मुक्तपणे व दिलखुलास संवाद साधणे हे त्यांना आवडायचे. त्यामुळे स्वपक्षासह इतर सर्वच पक्षात त्यांना आदराचे स्थान असायचे. राजकारणात कार्यरत असताना त्यांना अनेकदा भेटण्याचा योग आला. मात्र, त्यांच्यासमवेत झालेली शेवटची भेट ही अतिशय भावस्पर्शी होती, अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्यासह इतर मान्यवर आणि पत्रकार मित्र उपस्थित होते. ‌

0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *