तालुका चिखली. . स्थानिक अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन ” अनुस्वर” आयोजित केले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परमहंस मौहनी महाराज संस्थानचे अध्यक्ष माननीय माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्यासह आलेले प्रमुख अतिथी मान्यवर अनुराधा शैक्षणिक संस्थेचे संचालक डॉक्टर इंगळे सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ बियानी सर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई सर, माननीय आत्माराम देशमाने सर, माननीय सौ शोभाताई सोडतकर, माननीय वर्धमान डहाळे सर यांच्या हस्ते थाटामाटात झाले. प्रथम अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य माननीय बालैया गंगाराबोयना सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल वाचन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राहुल भाऊ बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले. ह्या प्रसंगी गेल्या व चालू शैक्षणिक वर्षाचे गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्नेहसंमेलनाचे कथानक ” वसुधैव कुटुंबकम *यावर आधारित अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्री प्राइमरी, प्रायमरी, आणि सेकंडरी सेक्शन च्या विद्यार्थ्यांनी आपले विविध नृत्याविष्कार, नाटिका व गीते सादर केले. हे सर्व सादरीकरण सर्व चिमुकले प्राथमिक व माध्यमिक वर्गाचे विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमात प्रायमरी आणि माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. बहुसंख्य विद्यार्थी अतिशय उत्साहाने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या सुप्त गुणांचे उत्तमरीत्या सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता नववीतील कुमारी अनुष्का सोळंकी हिने केले. व कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी ”वसुधैव कुटुंबकम” ह्या गीताने कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री बालैया गंगाराबोयना सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्याकरिता माध्यमिक विभागाती सांस्कृतिक प्रमुख श्वेता भटकर, सुवर्णा कुलकर्णी तर प्राथमिक विभागातील कल्पना लाघे यांनी अथक परिश्रम घेतले र्स्नेहसंमेलन प्रसंगी अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीच्या अध्यक्षा ॲडवोकेट सौ. वृषालीताई बोंद्रे व प.रा.मौ.शि. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. राहुल भाऊ बोंद्रे, यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री बालैया गंगाराबोयना, जया नन्हई मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीच्या अध्यक्षा एडवोकेट सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.