75 वर्ष वय त्याना बस प्रवास मोफत ! महामंडळाची डोके दुखी की खाजगी करनाकडे वाटचाल ?

Khozmaster
3 Min Read

सोयगाव प्रतिनिधी :- गोकुळसिंग राजपूत सोयगाव महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतंत्राच्या आमृतमोत्सवी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात ज्याचे वय 75 वर्ष वयापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरीकाना राज्यात कुठेही प्रवास करीत असाल तर महामंडळाच्या बसेसला प्रवास भाडे लागणार नाही मोफत प्रवास करता येइल आसा उपकृम राज्यात महामंडळ राबवीत आहे . हा उपकृम एक प्रकारे जेष्ठ नागरीकांसाठी फायदेशिर ठरणारा आसला तरी महामंडळाची डोके दूखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती प्रा.मदनभाऊ डोखळे डाभा (सामाजिक कार्यकर्ते) यांनी बोलताना सांगितले. या बाबत सविस्तर वतृ आसे की ; राज्य सरकार ने ठरवून दिल्या प्रमाणे ज्याचे वय 75 वर्ष झाले असलेल्या नागरीकास महारष्ट्रात बसेस मध्ये मोफत प्रवास ही योजना राबवण्याचे आदेश पारित केले दरम्यान त्या नुसार महामंडळा कडून हा आदेश आमलात आनत आसताना मात्र वहाकास तारेवरची कसरत करावे लागात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वयाचा दाखला म्हणून आधारकार्ड, मतदान ओळख पत्र, पॅन कार्ड या पैकी कोणतेही पूरावा म्हणून ओळख पत्र असेल तर चालतो या आदेशान्वये प्रवाशी ओळख पत्र दाखवत आहेत व प्रवास सुद्धा करीत आहेत मात्र ज्याचे वय 50 ते 55 आहे तरी तो प्रवाशी अवैध पदधतीने काढलेले बोगस ओळख पत्र दाखवून प्रवास करीत आहेत वाहकाना समजून सुद्धा प्रवाशाना कांहीच म्हणता येत नाही, अशा मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सद्या संख्या बस मध्ये 60/ ते 70/ दिसून येत आहेत त्यात 65 वर्षवरील जेष्ठ नागरीक 50% सवलतीची संख्या 10 % अपग । % ते २ % टक्के तर फूल तिकीट देऊन 5% ते 10% प्रवाशी प्रवास करताना दिसून येत आहेत सद्या महामंडळाच्या बसेस मात्र गचागच भरून जात आहेत मात्र महामंडळाचे उत्पन्न घटत आहे. महामंडळाच्या बसेसना सद्या बाहेरील खाजगी डिझेल पंप द्वारे डिझेल घ्यावे लागत आहेत उत्तपन कमी झाल्यामुळे डिझेल साठी चनचन भासत आसलेले दिसून येत आहे .

“वरिष्ठ आधिकारी कर्मचाऱ्यास सुचना करतात उत्तपन्न वाढवा , बसमध्ये प्रवाशी खचाखच भरलेले मात्र उत्पन्न कमी, शासनाचे धोरन राबवणे प्रवाशासाठी सुवेधाचा उपकृम मात्र बोगस गीरी प्रवाशा मुळे महामंडळाची डोके दुःखी ठरत असलेले दिसून येत आहेत या वर राज्य शासन किवा महामंडळाकडून काही ठोस निर्णय घेतले गेले नाहीतर भविष्यात महामंडळाचे चाके थांबतील किंवा उत्पन्न कमीच्या शिर्षकाखाली खाजगी करणाची चाहुलच आहे की काय ? असा प्रश्न सामान्य प्रवाशाना पडलेले दिसून येत आहे.

प्रा.मदनभाऊ डोखळे(सामाजिक कार्यकर्ते)डाभा ता सोयगाव

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *