सतिश मवाळ .मेहकर मोदी सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ” विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेचा रथ आज प्रथमच मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे पोहचला असता भाजपा अंजनी बु जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राजेश टाले यांनी पदाधिकारी सह त्यांचे मूळ गावी स्वागत करत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले
उज्वला योजना, पी एम किसान सन्मान निधी, स्किल योजना, जनधन बँक खाते, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम आवास योजना, पीएम जन आरोग्य योजना अशा योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यांत आली आहे.
यावेळी आरेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ,अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…
Users Today : 36