१० जानेवारी रोजी विधानसभेच्या १६ आमदारांना अपात्र करणार की तारणार?

Khozmaster
3 Min Read

मुंबई:-महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या १६ विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे अविरत सुरु असून याचा निकाल देण्याकरिता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारी २०२४ पर्यंत मुदत दिलेली आहे त्यामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात सुध्दा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे रोज बारा बारा तास अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या आमदारांचे जाब जबाब व पुराव्या संदर्भात सुनावणी घेत होते संपूर्ण पक्षांची बाजू जवळपास विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी जाणून घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल तब्बल तीन वेळा निवडून आलेले अब्दुल सत्तार,पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल आमदार संदिपान भुमरे,भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार तानाजी सावंत, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संजय शिरसाट,भायखळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार यामिनी जाधव, एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार चिमणराव पाटील,महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार भरत गोगावले,चोपडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या आमदार लता सोनावणे,मुंबई -मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार प्रकाश सुर्वे, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार बाळाजी किणीकर, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार अनिल बाबर, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार महेश शिंदे,मेहकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार डॉ संजय रायमुलकर, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार रमेश बोरनारे व उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार बालाजी कल्याणकर यांना १० जानेवारी रोजी अपात्र करणार की तारणार?हा सवाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करुन आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष अतिशय महत्वाकांक्षी पक्ष असून नुकत्याच तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ला बहुमत मिळाले असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले असून महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी कमीत कमी ४० जागा जिंकण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केले असल्यामुळे येत्या १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवून भाजपा कुरघोडी तर करणार नाही ना अशा शंका कुशंकांना पेव फुटले असून खरेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोबत घेऊन महाराष्ट्राची सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यात यशस्वी होते की काय याची खमंग चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गावा गावात व गल्लीबोळात चर्चिली जात आहे.या आमदारांना जर पुढील निवडणुकीच्या कालावधी पर्यंतच अपात्र ठरवून भारतीय जनता पार्टीचे महत्त्व वाढवायचे एवढाच उद्देश असेल तर भविष्य काळात राज्य पातळीवर अशा प्रकारच्या बंडखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही जर भविष्यातील अशा प्रकारच्या बंडखोरीला आळा घालण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या घामाच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही पक्षपात न करता विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे तरी याबाबत काय होणार हे मात्र १० जानेवारी २०२४ नंतरच कळेल एव्हढे मात्र निश्चित खरे….

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *