जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे सहा महिन्यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या वाळूवर डल्ला मारल्या जात असून कुंपणच शेत खात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केलाय. बाबुलतारा हे गाव दुधना नदीच्या काठावर आहे. अवैध रेतीचे केंद्र म्हणून या गावाचा उल्लेख नेहमीच होतो. सहा महिन्यांपूर्वी दी. २८ जून रोजी या गावातील गायरानातन सुमारे २२ ब्रास अवैध वाळू प्रशासनाने जाप्त करून तलाठी एम के मंडलिक यांनी पंचनामा केला होता. याचं जप्त करण्यात आलेल्या वाळूला चटकी लागली असून गाव राखणारच शेण खातेय असा काहीसा प्रकार दिसतो आहे. कारण सरपंचावरचं थेट आरोप करण्यात आला
आहे. या जप्त केलेल्या वाळू साठ्यातून निम्मी वाळू लंपास केल्याची तक्रार २२ डिसेंबर रोजी उप सरपंच दीपक काळे, माजी सरपंच चंद्रभान मुळे, विष्णू जगताप व भारत पंडित यांनी प्रशासनाकडे केली आहे. ही वाळू कोणी लंपास केली त्याची माहितीही त्यांनी तहसील प्रशासनाकडे.
केलेल्या तक्रारीत दिली आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर या जप्त वाळूचा लिलाव का करण्यात आला नाही हा प्रश्न आहे. दुसरीकडे आरोप बिनबुडाचे असल्याचे सरपंच लवकरे यांनी म्हटले आहे.