ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, इन्फ्रास्ट्रक्चर हे कितीही महत्त्वाचे असले तरी निसर्गाचा समतोल हा देखील तितकाच महत्वाचा आहे. रस्ते, दळणवळण, इन्फ्रास्ट्रक्चर शहरीकरण या गोष्टी होत असताना निसर्गाचा समतोल राखला जावा ही भूमिका कायम मांडत आलो आहे व त्याच समविचाराचे लोक आपल्या मतदारसंघात आहेत व शहरात राहून देखील निसर्ग जोपासतात ही बाब संपूर्ण शहरातील नागरिकांना देखील प्रेरणा देणारी व अनुकरणीय आहे.
पिंपरी मतदारसंघातील महिंद्रा सेंट्रलिस सोसायटी ने आज एक फ्लॅट एक झाड ही संकल्पना राबविली त्या वृक्षारोपण मोहिमेला उपस्थित राहून सोसायटीच्या उपक्रमास प्रोत्साहन दिले.अशी मोहीम सर्व गृहनिर्माण संस्थेने राबवावी व फक्त वृक्षारोपण न करता त्याचे संगोपन ही करावे अशी सूचना यावेळी मांडली. ह्या मोहिमेला संपूर्ण शहरातील सर्व गृह निर्माण संस्थेत राबविण्यासाठी शासन प्रशासनाला सोबत घेऊन येत्या काळात विशेष प्रयत्न करणार आहे.
आजच्या कार्यक्रमास महिंद्रा सेंट्रलिस सोसायटी चे चेअरमन संतोष इंगळे,सचिवअजय रैना.खजिनदार
राजेंद्र साळुंखे,अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांच्या सह सोसायटीमधील सर्व सभासद उपस्थित होते.