डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर आणि कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच आमदार सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज कृषी प्रदर्शनाची सांगता आज आमदार पी.एन. पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली. या कार्यक्रमास आमदार जयंत आसगावकर सर, माजी आमदार संजय बाबा घाटगे जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी बांधवांचा तसेच कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभला. या प्रदर्शनामध्ये 9 कोटींहून अधिकची उलाढाल झाली.
याप्रसंगी 12 कृषितज्ज्ञांना कृषीसेवारत्न पुरस्काराने तसेच फळे, भाजीपाला, फूल यांच्या पीक स्पर्धा, भरड धान्य पाककृती स्पर्धा, जनावरांच्या स्पर्धा यांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास संजय घोडावत ग्रुपचे विश्वस्त विनायक भोसले, चितळे डेअरीचे चंद्रशेखर कुलकर्णी, रिलायन्स ग्रुपचे सत्यजित भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, गोकुळचे माजी चेअरमन व संचालक विश्वास पाटील (आबाजी), काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे सभापती भरत पाटील, अरुण भिंगारदेवे, विनोद पाटील, धीरज पाटील, गोकुळचे सर्व संचालक, बाजार समिती संचालक, माजी नगरसेवक, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.