गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
शहरातील ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम मंठा युनिटतर्फे ता 25 डेस्मबर 2023 सोमवार रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नगरपंचायतील कर्मचाऱ्यांना व शहरातील गोरगरीब गरजूंना मान्यवरांच्या हस्ते मोफत ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मारुती खेळकर साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हाफेज शबाब बागवान, गटसमन्वयक अधिकारी के जी. राठोड , विभागीय तालुका समन्वयक अधिकारी गौतम व्हावळ , माजी नगरसेवक तथा सभापती इलियास भाई कुरेशी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेशराव कुलकर्णी, रणजीत बोराडे, तुकाराम मुळे, यामान्यवरांची उपस्थिती होती.
ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम मंठा युनिट मागील सात वर्षांपासून गोरगरीब गरजूंना निशुल्क निस्वार्थ सेवा करीत आहे. ही एक गैर-राजकीय आणि गैर-धार्मिक संस्था आहे आणि कोणत्याही भेदभाव शिवाय सेवा कार्य करते. पयामे इन्सानियत फोरम दरवर्षी गरजूंना ब्लँकेटचे वितरण करते. यानिमित्ताने याही वर्षी कडकडीची गुलाबी सर्दी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब गरजूंना कार्यक्रमात उपस्थित शासकीय मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत 70 गरजूंना मोफत ब्लॅकेट वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाले.
याकार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरमचे मौलाना वसीम नदवी, मौलाना सलमान नदवी, , परवेज भाई, नजीर कुरेशी, मुस्तकीम राज यांचा सिंहाचा वाटा होता.