शासनाचा व पीक कंपनीचा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने केला निषेध
भंडारा तालुक्यातील वाकेश्वर येथील घटना
संजीव भांबोरे
भंडारा( प्रतिनिधी )नुकसान झाली मात्र पीक विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तब्बल 2 एकरातील धान पिकाच्या पुंजण्याला तर एका शेतकऱ्याने उभ्या धान पिकाला आग लावीत ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने पुढाकार घेत शासनाचा व पीक विमा कंपनीचा निषेध केला व्यक्त केला आहे.ही घटना भंडारा जिल्ह्यातील वाकेश्वर येथे घडली असून सच्छिदानंद देवराम लेंडारे व गंगाधर खोब्रागडे अशी धान पिकाला आग लावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या मालकी शेतात यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती.धानपिक लागवड करण्यासाठी विविध बँक,सेवा सहकारी संस्थेसह हातउसने पैसे देखील घेतले होते.बँकेसह हातउसने घेतलेल्या पैशांत शेतकऱ्यांनी मालकी शेतात खरीपातील धान पिकाची लागवड केली.महागडी खते व औषधी खरेदी करून त्यांची फवारणी देखील केली. मात्र ऐन धान कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली.तक्रारीनुसार प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटून देखील शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मालकी शेतातील उभ्या धान पिकाला तर एकाने शेतशिवारातील धान पुंजण्याला आग लावीत पीक विमा कंपनीसह शासनाचा निषेध नोंदविला आहे.