नागपूर : पूनम टॉवर्स व पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरू

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूर

पूनम टॉवर्स आणि पूनम चेंबर्समधील अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम नागपूर मनपाने सुरू केले आहे, अशी माहिती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला दिली. या प्रकरणाशी निगडित दोन याचिका हायकोर्टात प्रलंबित आहेत.
कोर्टाने आधीच या इमारतींमधील अवैध बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता. सादर अहवालानुसार, पूनम चेंबर्समधील ७० टक्के अनधिकृत बांधकाम पाडले गेले असून पूनम टॉवर्समधील पाडकाम सुरू आहे. मनपाने हे बिल एन. कुमार यांना पाठविणार असल्याचे देखील कोर्टाला कळवले.
मागील सुनावणीदरम्यान एन. कुमार यांनी बांधकाम नियमितीकरणाच्या मुद्यावर वारंवार युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला होता. “आपको सूनना पडेगा, हम क्या सुसाइड कर ले क्या?” असे वक्तव्य केल्याने कोर्टाने त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले व अखेर न्यायालयाबाहेर नेण्यात आले.
यानंतर, प्रकरणात सादर केलेला १० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट चुकीने वितरित झाल्याचे समोर आले. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हायकोर्टास माफी मागितली. प्रकरणात आरबीआय, मनपा आणि सरकारच्या वतीने वकिलांची बाजू मांडण्यात आली.

0 9 4 1 8 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *