नागपूर
स्टेडियमजवळील उदासी आश्रमाजवळील झोपडपट्टीत सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या, अशी माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत जवळपास नऊ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक संशोधनात आढळले आहे.
या घटनेत योगेश ठाकूर, सुरेश ठाकूर, बसंती ठाकूर, राजेंद्रसिंग सडक, कांचन पटेल आणि मनोज यादव यांच्या घरातील साहित्य जळून नष्ट झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच मनपा सिव्हिल लाइन, गंजीपेठ आणि कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रातील पथकांनी आग विझवली.
महापौर नीता ठाकरे आणि प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक आगग्रस्त कुटुंबीयांची भेट देऊन, निवारा आणि तात्पुरती उदरनिर्वाह मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. महापौरांनी अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीसह त्वरित प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही घटनेची माहिती देण्यात येईल.
Users Today : 16