चिखली कॉग्रेसचे ‘संविधान जागर प्रषिक्षण’ षिबीर जनजागृती करणारे – राहुलभाऊ बोंद्रे जि.प.सर्कल निहाय तिन दिवषीय प्रषिक्षण षिबीरातुन केली लोकषाही व संविधान जनतागृती

Khozmaster
3 Min Read
चिखली:  दि. 26 डिसेंबर 2023
देषाच्या लोकषाहीचे रक्षण व संविधानाचे संवर्धन करण्यासाठी विचारांची लढाई लढणारे देषभक्त सैनिक घडविण्याचे काम करण्याच्या हेतुने बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या संकल्पनेतुन तिन दिवसीय ‘संविधान जागर प्रषिक्षण’ षिबीराचे आयोजन करण्यात आले होते. चिखली विधानसभा मतदार संघातील कॉग्रेस व महाविकास आघाडीच्या बी.एल.ए, बुथ अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, तसेच गावा गावातील महत्वाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी जिल्हा परिषद निहाय दिनांक 22 ते 24 डिसेंबर या तिन दिवसात संपन्न झालेल्या प्रषिक्षण षिबीराला ग्रामीण भागातुन नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. संविधानाचा जागर चिखली मतदार संघात ऐतिहासीक ठरत असुन चिखली कॉग्रेसचे संविधान जागर प्रषिक्षण षिबीर सर्वसामान्यांचे जनजागृती करणारे असल्याचे वकत्व्य बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले. या षिबीराला प्रषिक्षक म्हणुन पुणे येथील लोकायत सोषल फोरमचे सदस्य इंजिनीअर निखील रांजनकर व निष्चय साधना हे लाभले होते.
या प्रषिक्षण षिबीरात दिनांक 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर या तिन दिवसात उदयनगर, अमडापुर, इसोली, सवणा, केळवद, धाड, मासरूळ, रायपुर, साखळी, मेरा बु., मेरा खुर्द या जिल्हा परिषद सर्कल निहाय विविध ठिकाणी संविधान जागर प्रषिक्षण षिबीर संपन्न झाले. या षिबीरांदरम्यान बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे नागरीकांषी संवाद साधतांना म्हणाले देषात मनुवादी विचारसारणी व हुकूमषाहीने कळस गाठला असुन लोकषाही व संविधान पायदळी तुडविल्या जात आहे. लोकषाहीतील प्रष्न सुटावे, देषभरात भाजपा सरकारकडुन सुरू असलेल्या अनागोंदी व मनमानी कारभाराला आळा घालण्याबरोबरच लोकषाही व संविधानाचे संवर्धन करण्याचे गरज प्रत्येक देषवासियांवर येवुन ठेपली आहे. देषात शेतकरी विरोधी सरकार कार्यरत असुन शेतक-यांचा पिक विमा, कर्जमाफी, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, सुषिक्षीत पदविधर बेरोजगारांचे प्रष्न आ वासुन उभे ठाकले आहेत. सामान्य माणुस महागाई,बेरोजगारी, विविध सरकारी टॅक्स वाढीत डुबत असतांना सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रष्नाकडे दुर्लक्ष व्हावे यापेक्षा मोठे दुर्देव ते कोणते ? असा प्रतिप्रष्न उपस्थित करीत गत 9 वर्षात मोदी सरकार बडया उद्योगपंतीना कर्जमाफी व कार्पोरेट करात भरघोस सुट देत असल्याचेही यावेळी राहुलभाउंनी सांगितले.
संविधान जागर या तिन दिवसीय षिबीराच्या माध्यमातुन लोकषाही व संविधान संवर्धनासाठी पुणे येथील लोकायत सोषल फोरमचे प्रषिक्षक इंजिनीअर निखील राजनंकर व निष्चय साधना यांनी जिल्हा परिषद सर्कल निहाय जनजागृती केली. त्यात स्वातंत्र्यापूर्वीपासुन देषात मनुवाधी विचार रूजविण्यात आले, देषाची फाळणी कसी कुणी केली ? जनतेत हिंदु मुस्लीमांमध्ये फुट पाडण्याची कट कारस्ताने करण्यात आली, स्वातंत्र्य चळवळ व आंदोलनाला सुरूंग लावण्याची कामे मनुवादी विचार सारणीच्या माध्यमातुन करण्यात आली. याउलट कॉग्रेसला छत्रपती षिवाजी महाराज, संत ज्ञानेष्वर माउली, संत तुकाराम महाराज, फुले-षाहु-आंबेडकर, गांधी-नेहरू, स्वामी विवेकांनद यांच्या विचारांचा वारसा असुन सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, बंधुभाव, ही विचारसारणी देषाला तारणारी असल्याचे सांगितले.
प्रषिक्षण षिबीर यषस्वी पार पडण्याकरीता मुख्य समन्वयक अषोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, सरपंच सौ. वैषाली संजय गवई यांच्यासह सरपंच मनोज लाहुडकर, श्याम पठाडे, गजानन लांडे पाटील, अनिल फेफाळे, रामभाउ जाधव, विकास लहाने व चिखली तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, बुलडाणा तालुका कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकिषोर षिंदे यांनी व स्थानिक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.  


Thanks to regards. 
RAJU BODKHE 
9822576951
0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *