भरधाव कारला अपघात एक ठार दोन जखमी!

KHOZ MASTER
1 Min Read
चिखली मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज :– भरधाव कार दुभाजकावर आदळल्याने युवक जागीच ठार तर दाेन जण गंभीर जखमी झाले आहे़ ही घटना साेमवारी रात्री पालखी महामार्गावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील तळणी फाट्याजवळ घडली़ रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार असे मृताचे नाव आहे़.
लाेणार येथील तरुण उद्याेजक रोहन राजू सोसे हे कार क्रमांक एमएच २० सीएस ९२६१ ने पालखी महामार्गावरून मंठ्याकडून लोणारकडे येत हाेते़ दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने तळणी फाट्यावजळील दुभाजकावर भरधाव कार धडकली़ या अपघातात कारमधील रोहन राजू सोसे (वय ३५) रा. लोणार यांचा मृत्यू झाला तर रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेटे, रा. लोणार हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मंठा पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, तळणी बीड जमादार रखमाजी मुंडे, कॉन्स्टेबल मनोज काळे, ब्रह्मानंद जायभाये, पांडुरंग हगवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली़, तसेच जखमींना उपचारासाठी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ प्रिंटिंग व्यवसाय करणाऱ्या राेहन साेसे यांनी नुकतीच ५० लाख रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली हाेती़ त्यांच्या वडिलांना अर्धांगवायू झाला असल्याने राेहन हेच कर्ते हाेते़ त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा आप्त परिवार आहे.
0 9 7 2 1 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *