सोयगाव येथील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल २३ वर्षीनीं आले एकत्र,स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,
पुन्हा सन.२०३० साली कार्यक्रम मोठ्या उत्साहात करणार विद्यार्थ्यांचे दिले आश्वासन
सोयगाव,दि.२६( प्रतिनिधी) गोकुळसिंग राजपूत
सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळा सोयगाव येथील १९९९-२००० मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी सह परिवार तब्बल २३ वर्षांनी सेन्हसंमेलन मेळावा सोयगाव येथे उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याला १९९९-२००० मधील दहावीचे १५० पैकी १०० विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी हजर होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमचे आलेले सहकुटुंब परिवार हे होते,हा स्नेहसंमेलन संमेलन कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला चार ते पाच तासांचा कार्यक्रम कमीत कमी आठ तास चालला. सर्वप्रथम सकाळी आलेले सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी भेटीगाठी घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
एकमेकांचे बदलेले चेहरे,राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २३ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळा १९९९ ते २००० या कालावधीत दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले.कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी,परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात,नोकरीत सक्रिय झाले.तर कोणी शेतीच्या क्षेतात्र,व्यापारी,पत्रकार,असे व्यस्त झाले आहे.त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती.त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती.यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक-एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला.आणि हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी बबलू सोहणी यांच्या शेतात भव्य आणि दिव्य असा स्नेह संमेलन मेळावा झाला या मेळाव्यास खुप लांबून विद्यार्थी आले होते.काही विद्यार्थी शेगाव,मुंबई,पुणे,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,भुसावळ,जामनेर, गलवाडा,लोहारा,मेणगाव,माळेगाव पिंप्री,या अशा अनेक भागातून विद्यार्थी आले होते.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देत असताना काही विद्यार्थी भावुक पण झाले.माजी विद्यार्थ्यां संतोष सोनवणे यांनी आलेले सहकुटुंब सहपरिवाराला मोलाचे मार्गदर्शन करून आलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मार्गदर्शन योग्य प्रकारे केले.यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.सोयगाव गावात गेलेले आपले बालपण जुन्या आठवणी यांना उजळा दिला.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.
असा गेट-टुगेदर चा कार्यक्रम अनेक वेळा घ्यावा अशी त्यांनी विनंती पण केली संजय कासार यांनी केली.तसेच बाल गोपालांनी गाण्याचा आस्वाद आम्हा विद्यार्थ्यांना दिला त्यांच्या त्या जुन्या शैलीतील गाण्याने माजी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.काही माजी विद्यार्थ्यांना पाहून उच्च पदावरून भावुक पण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश फुसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गोपाल चौधरी यांनी मांडले शेवटी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ॲड विशाखा पठाडे यांनी मानले.आम्हाला भव मूल्य असे अनमोल असे मार्गदर्शन सरपंच कविता महाजन यांनी करून आपल्या शाळेचे व गावाचे नाव कसे वाढेल याचे मार्गदर्शन केले.दुपारी मधुर सुरूची जेवणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख परेड झाली.
त्यानंतर संयोजकांनी शेवटी लवकरच आपण स.न. २०३० गेट-टुगेदर घेऊ असे आश्वासन देऊन कार्यक्रम संपवला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश फुसे व आभार गोपाल चौधरी यांनी केले.लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी ही देण्यात आली.
या कार्यक्रमात यावेळी गणेश आगे,बबलू सोहनी,एकनाथ कावले,ज्ञानेश्वर फुसे,संतोष सोनवणे, ,योगेश बोखारे,ऋषी काळे,संजय आगे,गजानन गव्हाड,ज्ञानेश्वर फुसे,शंकर काळे, योगेश फुसे,संजय कासार,संतोष सोनवणे,अरुण जगताप, देवेंद्र तेलंग्रे,प्रमोद तायडे,साईनाथ बडगुजर,संजय वाघ,दिपक बागले,किशोर फुसे,बलीराम चव्हाण,रमेश राठोड,विष्णू सोनवणे(सायकल चालक),रवींद्र घन,गणेश मंडवे,रवींद्र जावळे,ज्ञानेश्वर आगे,गणेश(बाबा) पिंगाळकर,शांताराम ढमाले,प्रताप पाटील,राजू इंगळे,योगेश काळे,राजू औंरगे,भगवान पंडित,ॲड विशाखा पठाडे,कविता महाजन,किर्ती कायस्थत,जयश्री फुसे,अलका लाड,मनिषा देहाडाय,सुनिता चौधरी,आलेले सर्व कुटुंब सहपरिवार आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो –