थाप मारून पळवून नेलेल्या महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार.

Khozmaster
3 Min Read

थाप मारून पळवून नेलेल्या महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार.

प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.

पैशाच्या लोभामुळे जबरदस्तीने लग्न लावून देणाऱ्या व अत्याचार करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजकोट येथून आपली कशीबशी सुटका करून नागपूर गाठल्यानंतर पोलिसा समोर कथीत केलेल्या आपल्या व्यथेमुळे ही खळबळ जनक घटना उजेडात आली आहे.

पोलीस स्टेशन यशोदानगर, नागपूर हद्दीत आपल्या ४ वर्षीय मुलींसह राहणारी २६ वर्षीय महिलेसह इतर दोन मुली वय अंदाजे १७ वर्ष यांना आरोपी महिला नंदा पौनीकर हिने काटोल येथे एका महिलेची प्रसूती झालेली आहे. त्यामुळे कामा करीता जायचे आहे अशी थाप मारून दिनांक २५ जुलै २०२३ रोजी रेल्वेने काटोल येथे जात असताना धावत्या ट्रेनमध्ये आरोपी महिला नंदा पौनीकर ची साथीदार आरोपी मंगला वरकडे हिने पीडित महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि जास्त कुठे वाच्यता केल्यास ४ वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी मंगला हिने पीडित महिला व त्या मुलींना घेऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी राजकोट, गुजरात येथे पोहोचली. आरोपी महिलेने तिचा साथीदार वय अंदाजे ६५ वर्ष जो उंचीने बुटका असलेला याने दोन्ही मुलींना सोबत घेऊन कोर्ट परिसरात त्यांचे इतरांशी तर पीडित महिलेचे आरोपी संतोष वय ३० वर्षे जो की एक सफाई कामगार असलेल्या सोबत भांगेत कुंकू लावून लग्न लावून दिले. तसेच स्टॅम्प पेपरवर त्यांचे अंगठे सुद्धा घेतले. आरोपी मंगला हिने पीडित महिलेला तिच्या ४ वर्षाच्या मुलीसह आरोपी संतोष सोबत कलावाड नगर नाका, जामनगर, गुजरात येथे पाठविले. आरोपी संतोष सोबत त्याचे दोन भाऊ गोलू वय २१ वर्षे, प्रतीक वय १९ वर्ष हे सुद्धा होते. त्यांनी दिनांक २६ जुलै २०२३ ते ७ सप्टेंबर २०२३ दरम्यान वारंवार जबरीने संभोग केला. पिडीताच्या पतीने आरोपी नंदा पौनीकर हिला त्याच्या पत्नी बाबत जाब विचारला असता दिनांक १७ डिसेबर २०२३ रोजी पीडिताचा पती तसेच आरोपी नंदा हिचा पती यादवराव पौनीकर यांच्यात वादविवाद होऊन मारामारी झाल्याने यशोदानगर पोलीस स्टेशन ला कलम ३०७ भा.द.विं नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेची मदत घेऊन पीडीता कशीबशी आपली सुटका करून घेऊन नागपूर गाठल्यानंतर पीडित महिलेने पोलीस आयुक्तास याबाबत कळविले. त्यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी व्यापार प्रति कक्षेचे अधिकारी म.स.पो.नि.रेखा संकपाळ यांनी चौकशी करून सदर घटनेमध्ये एकूण ६ आरोपी निष्पांत करून पोलीस स्टेशन यशोदानगर येथे कलम ३६३,३६५,३७०,३७६(२)(एन ) ३७६(ए)(बी) ५०६(ब) भा.द.विं सहकलम ४,६,८,१२ पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *