प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा

Khozmaster
6 Min Read
माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित” ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती” चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे साहेब यांच्या आदेशान्वये बुलढाणा जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने , 24 डिसेंबर 2023 रोजी “लक्ष्मीप्रलाद वेल्फेअर फाउंडेशन” “जापनीज लैंग्वेज प्रशिक्षण केंद्र “जाफराबाद रोड, चिखली “राष्ट्रीय ग्राहक दिन” ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे नागपूर विदर्भ मुख्य संघटक सुनिल अंभोरे यांच्या उपस्थितीत येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गंगारामजी उबाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे विनोद हिवाळे वरिष्ठ लिपिक भूसंपादन विभाग मंत्रालय मुंबई ,संतोष हिवाळे बहुजन युथ पॅंथर सेना बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष पत्रकार प्रतापराव मोरे, डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, संघटक नारायणजी दाभाडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट बाळासाहेब वानखेडे, वजन मापे चिखली तालुका अधिकारी करपे साहेब, डिजिटल मीडिया परिषद चिखली तालुका सचिव पत्रकार एकनाथ माळेकर, जापनीज लैंग्वेज प्रशिक्षण केंद्र चिखलीचे शिक्षक बाळासाहेब जाधव हे होते. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे लोणार तालुका अध्यक्ष सुनिल इंगळे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे ध्येय ,धोरणे, उद्दिष्टे, रणनीती, संघटन, कार्य, राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो, ग्राहक जनजागृती या विषयावर सखोल प्रकाश पाडला. वजन मापे चिखली तालुका अधिकारी करपे साहेब व त्यांची संपूर्ण टीम ग्राहक जनजागृती पर वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लावून वजन मापे संबंधी कशी ग्राहकांची लूट होते, त्यासाठी आपण कसे दक्ष राहायला पाहिजे आणि काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून ग्राहकांची लूट आपण थांबवू शकतो. ग्राहकावर जर अन्याय झाला असेल घेतलेल्या वस्तूची मूळ किंमत किती आहे किंवा त्यावर खोडतोड केलेली आहे का? त्याची एक्सपायरी डेट, मालाचा दर्जा व्यवस्थित आहे का नाही हे ग्राहकांनी समजून घेणे गरजेचे आहे. जर ग्राहकावर अन्याय झाला असेल तर त्यांनी कुठे तक्रार करावी त्यासाठी आता ऑनलाईन पद्धत सुरू आहे. कुठूनही आपण ग्राहकाची फसवणूक झाली असेल तर ऑनलाईन तक्रार करून आपण न्याय मागू शकतो. वजन माफी संबंधित त्यांनी सखोल मार्गदर्शन केले . ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे नागपूर विदर्भ मुख्य संघटक सुनिल अंभोरे यांनी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमध्ये करावयाची कार्य ,सदस्यांची कर्तव्य, मनुष्य हा जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ग्राहकच असतो त्यामुळे त्याची आयुष्यभर लूट कशाप्रकारे होते ही लुट होऊ नये त्यासाठी ग्राहकांचे हक्क ,अधिकार ,सुविधा, न्याय, ग्राहकांची होत असलेली फसवणूक, तोटे यासाठी ग्राहक दक्ष नसतो. म्हणूनच ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या माध्यमातून ग्राहकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न समितीचा राहील. समितीचे कार्य सर्व ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी समितीच्या पदाधिकारी यांची जिल्ह्यात संघटन आणखीन मजबूत करून एकजुटीने समितीचे कार्य सुरू ठेवावे व ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले नामवंत एडवोकेट बाळासाहेब वानखेडे यांनी ग्राहक कायदा कधी अस्तित्वात आला. ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व सुविधा काय आहेत. एखाद्या ग्राहकावर जर अन्य झाला असेल तर त्यांनी कोणत्या न्यायालयात दाद मागायची ती कशा पद्धतीने मागायची आणि किती दिवसात न्याय मिळतो. ग्राहकांनी जागृत व्हावे ,सतर्क रहावे यासाठीचे सखोल कायदेविषयक मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमध्ये मी स्वतः विधी सल्लागार म्हणून आपल्या समितीमध्ये राहील अशी त्यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ,पत्रकार प्रताप मोरे यांनी ग्राहक जनजागृती वर मार्गदर्शन केले व बुलढाणा जिल्ह्यातील समितीचे कार्य पाहून समितीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. ग्रामीण पत्रकार संघटना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी यावेळी त्यांनी ग्वाही दिली व ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गंगारामजी उबाळे यांनी समितीचे कार्य, जबाबदारी, कर्तव्य याची माहिती दिली. व सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आपसातील मतभेद दूर बाजूला सारून एक जुटीने ग्राहकांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत व जिल्ह्यात समितीचे संघटन मजबूत करावे. कुठल्याही ग्राहकावर अन्याय झाल्यास आमच्या जिल्ह्यातील समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन करून मदतीसाठी बोलवावे आम्ही अहो रात्र त्यांच्यासाठी दक्ष आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे समितीचे कार्य चालू आहे. ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. समितीमध्ये माजी प्राचार्य ,माजी पोलीस अधिकारी, नामवंत वकील, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत आहेत त्यामुळे समितीला मोठा लाभ होत आहे. संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे यांचे हात मजबूत करून संघटनेचा प्रचार ,प्रसार प्रसार करावा, अशी त्यांनी पदाधिकारी यांना आवाहन केले व ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बुलढाणा जिल्हा सचिव अशोक काकडे, गणेश चव्हाण, विनोद खजुरे, राहुल वाकोडे, रामप्रसाद केदार ,राजू मोरे ,बुलढाणा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप वनवे, विठ्ठल राठोड , गणेश चव्हाण , अरुण तौर, भालेराव, राजेंद्र डोईफोडे, दत्ता हाडे, मुन्ना ठाकूर ,मुबारक शहा ,उषा डोंगरे , सुनिल इंगळे,राजू डोंगरे, समाधान भालेराव, व जिल्ह्यातील ग्राहक ऊपभोक्ता संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोणार तालुका अध्यक्ष सुनिल इंगळे यांनी केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन समितीचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष माजी प्राचार्य खरात सर यांनी केले. व ग्राहक जनजागृती चळवळीवर मार्गदर्शन सुद्धा केले. व आभार प्रदर्शन समितीचे प्रसिद्धीप्रमुख दिलीप वनवे यांनी केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *