दोंडाईचा बस स्थानकावरून लामकानी गावाला मुक्कामाला जाणाऱ्या धावत्या बसचे टायर अचानक फुटल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला कठडा तोडून खाली उतरली. यामध्ये पाच महिला आणि बसचालक किरकोळ जखमी झाले आहेत.
सुदैवाने बसचालक संजय बुधा कोळी यांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला. अपघातात जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, की दोंडाईचा बसस्थानकातून ३५ प्रवासी घेऊन वाडीमार्गे लामकानी येथे सायंकाळी सहाला बसस्थानकातून निघाली होती. बस मांडळ चौफुलीपासून एक किलोमीटर अंतरावर गेली आणि अचानक बसचे डाव्या बाजूकडील पुढचे टायर फुटल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली. पाच फूट अंतरावरच विजेचा खांब होता. मात्र, सुदैवाने बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा आगारातील वाहतूक निरीक्षक जगदीश पाटील, वाहतूक नियंत्रण वसंत कोळी, नरेंद्र भाबड, व्ही. डी. जाधव, पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
Users Today : 26