पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले सराईत गुंड ,अग्निशस्त्र चार जिवंत काडतुसासहित ताब्यात पोलीस स्टेशन तुमसर यांची कामगिरी

Khozmaster
2 Min Read
संजीव भांबोरे
भंडारा ,पोलीस स्टेशन गोबरवाही पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 291/ 2023 कलम 302, 147, 148 ,149 ,120( ब ) भा द वि सह कलम ३/२५, ४/२५, २७, भाहका सहकलम 135 मपोका सहकलम३(१)(२),३(२),३(४), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम गुन्हातील पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीस तपास अधिकारी श्रीमती रस्मिता राव उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांनी तपास करून पोलीस पथकासह परत जात असताना भंडारा शहरातील शितला माता मंदिर जवळ कुख्यात गुन्हेगार रत्नदीप उर्फ कालू माटे आपल्या साथीदारांसह त्यांच्या मारुती ब्रेझा चार चाकी गाडीने जातानी दिसल्याने त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना थांबवून पोलीस पथक विचारपूस करीत असताना शिवांक ठाकूर यांनी त्याचे कमरेतून अग्निशास्त्र काढून पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे पोलीस स्टेशन तुमसर यांच्यावर काढून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणल्याने वेळीच पोलीस निरीक्षक त्यांनी पोलीस पथकाच्या मदतीने त्याचे हातातील अग्नि अग्निशास्त्र चार जिवंत काडतुसासहीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन भंडारा येथे तसेच भंडारा येथील पोलिसांचे मदतीने रत्नदीप उर्फ कालू माटे भूपेंद्र बिल्लोडकर, शिवान ठाकूर ,सत्यम ठाकूर सर्व राहणार तुमसर यांना ताब्यात घेतले व इतर तीन आरोपी तेथे जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले असून पोलीस स्टेशन त्यांचा शोध घेत आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास भंडारा पोलीस स्टेशन करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील वेगळ्या वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून ते काही दिवसापूर्वी गोबरवाई येथे खून झालेल्या नवीन शेख यांचे साथीदार आहेत .सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी ,ईश्वर कातकडे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा ,यांच्या मार्गदर्शनात श्रीमती रस्मिता राव उपविभागीय पोलिस अधिकारी तुमसर, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे साहेब ,पोलीस निरीक्षक नितीन मदनकर ,पोहवा दिलीप मते ,मार्कंड डोरले पोलीस स्टेशन तुमसर ,तसेच पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर , पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, पोहवा राजेश पंचबुदे ,पोहवा प्रशांत कुरंजेकर ,पोशी जगदीश श्रावणकर ,पोशी मंगेश माळोदे ,सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *