संजीव भांबोरे
भंडारा , लाखांदूर तालुक्यातील नांदेड नविन प्लॉट येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण प्रवचनकार श्री. ह.भ.प. सुनिल गुरुनुले महाराज आणी संच कासवी जि. गडचिरोली यांच्या रसाळ वाणीतुन २१ डिसे. ते २६ डिसे. २०२३ पर्यत ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पं.ह. देवाजी महाराज देवनगर कोंदुर्ली यांच्या हस्ते गोपालकाला चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटनेते मंगेश राऊत प्रमूख पाहुणे प्रमोद प्रधान तालुकाध्यक्ष भाजप लाखांदूर, उत्तमजी भागडकर तालुकाध्यक्ष कांग्रेस लाखांदूर, पत्रकार स्वप्नील ठेंगरी, गोपाल तर्रेकार उपसरपंच राजनी, गिरीश भागडकर, शहराध्यक्ष भाजपा तथा नगरसेवक नगरपंचायत कांचन गहाणे, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तुळशीदास बुरडे,राहुल कोटरंगे, विश्र्वपाल हजारे सकाळ प्रतिनिधि लाखांदूर ,हरीचंद्रजी भुते धान्य व्यापारी,शंभूजी नागपुरे गुरुजी , विलास मांडवकर ,श्री.रामदास बेदरे सर मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय ईटान, प्रेमानंद हटवार पत्रकार, विठ्ठल ईखार अवधूत टेड्रस उमरेड, शेखरजी चोपकर, सोमाजी चोपकार, पांडुरंग वैलथरे महाराज ,शेखर साठवणे, जगदिश वैधे, गोपाल नागपूरे , हरगोविंद नागपूरे ,दिलीप कुझेकार , बंडूजी कुझैकार, दिगांबर नागपूरे, दिपक राऊत, तेजराम हजारे , जयसिंग नान्हे विश्व हिंदू परिषद ,किरण नागपूरे,अरविंद हटवार ,योगेश चोपकार ,व मोठ्या संख्येने इतर सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे संचालन दिनेश साठवणे तर आभार प्रदर्शन विलास मांडवकर यांनी मानले.