Buldhana :
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार Dhrupadrao Sawale यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
१३ मार्च रोजी Rajarshee Shahu Engineering College येथे Sant Gajanan Maharaj College of Pharmacy तसेच Rajarshee Shahu Maharaj Ayurved College Hospital and Research Centre यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. समीर पहाड होते. प्रमुख अतिथी म्हणून Lilavati Blood Bank चे संचालक डॉ. अजित शिरसाठ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँकेच्या अधिकारी डॉ. कविता काळे (सावळे) उपस्थित होत्या. यावेळी द्वारका फाऊंडेशनच्या सहसचिव अॅड. कीर्तीताई पहाड, प्राचार्य डॉ. हर्षद केला, प्राचार्य डॉ. विजय बोरकर, प्रा. बी. व्ही. नरवाडे आणि डॉ. पी. एस. राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तरुण देशाचा कणा : डॉ. समीर पहाड
अध्यक्षीय भाषणात डॉ. समीर पहाड म्हणाले की, आजचा तरुण हा देशाचा कणा आहे. तरुणांनी केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता अशा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. “माझे रक्त, कोणाचे तरी प्राण” हा मंत्र जपत रक्तदानासारख्या कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अॅड. कीर्तीताई पहाड यांनी Dwarka Bahuuddeshiya Gramin Vikas Foundation मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अजित शिरसाठ यांनी अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सर व थॅलेसेमिया सारख्या आजारांमध्ये रक्ताचे महत्त्व स्पष्ट करत तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पी. एस. काटकर यांनी केले. District General Hospital Buldhana Blood Bank आणि लीलावती ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
Users Today : 33