चिखलीत बेकायदेशीर भंगार व्यवसायाविरोधात तक्रार निवासी भागातील साठवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप

KHOZ MASTER
1 Min Read

Chikhli :

शहरातील निवासी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर भंगार साठवणूक व व्यवसायाविरोधात नागरिकांनी Chikhli Municipal Council कडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

अॅड. मो. जुबेर मो. शफिउल्ला यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जाकीर हुसेन शाळेच्या मागील बाजूस तसेच मशिदीपासून सुमारे ६० फूट अंतरावर असलेल्या निवासी परिसरात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता भंगार साठवणूक व व्यवसाय सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी तसेच डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून आग लागण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकदा सूचना देऊनही संबंधितांनी व्यवसाय सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी करून बेकायदेशीर भंगार साठवणूक तात्काळ हटवावी, भंगार जप्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही कारवाई Maharashtra Municipal Councils Act 1965 अंतर्गत करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

0 9 4 2 3 0
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *