रवी काळे व दिलीप वाल्हेकर यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड.….. शिरूर शहर राष्ट्रवादी(अजित दादा गट) तर्फे फटाके वाजून जोरदार स्वागत.

Khozmaster
3 Min Read

शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण.बुधवार शिरूर शहरांमध्ये रवी बापू काळे व दिलीप नाना वाल्हेकर यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाली यावेळी सत्काराला उत्तर देताना, आमदार अशोक पवार यांच्यावर घणाघात करताना गेल्या पंधरा वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम करत असताना  माझ्या ताकदी पेक्षाही जादा भार उचलला परंतु मी नेहमीच बीपीएलच्या (दारिद्र्यरेषेखाली) यादीत राहिलो.  अशोक पवारांचा समर्थक  म्हणून तालुक्यात अनेक नेत्यांशी वेळप्रसंगी वैरही पत्करलं . परंतु स्वतःच्या वडिलांच्या नावाने असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आज खूप दयनिय अवस्था आहे. त्यांच्या ताब्यात कारखाना देऊन खूप मोठी चूक केली. गेली पंचवीस वर्ष या कुटुंबाने कारखान्याची एक हाती सत्ता उपभोगली परंतु आज रोजी या कारखान्याचा धुराडा बंद झाला आहे. असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

   आमदार साहेब सगळीकडे बोलता…  रवीला काय कमी केले, त्याला पद देऊन मोठे केले. यावेळी काळे यांनी सांगितले समोर येऊन बोला असे आव्हानही दिले. १९९७ साली जर कारखाना ताब्यात दिला नसता तर तुमची अवस्थाआज काय असती? असाही अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.
     तालुक्यातील अनेक पदाधिकारी अशोक पवार यांच्यापासून दूर गेलेत यावर भाष्य करताना काळे म्हणाले आमदार पवार यांनी कार्यकर्त्यांना कधी ताकद दिली नाही कार्यकर्ते पदाधिकारी नेहमीच बीपीएलच्या यादीत कसे राहतील यासाठीच प्रयत्न केला. त्यांच्या या वागण्यामुळेच आम्ही अजित दादांचे नेतृत्व मान्य केलं. ज्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून तन,मन धनाने नेहमीच बरोबर राहिलो पण शेवटी आमच्या पदरी निराशा आली. त्यांच्या मी ! पणामुळे अनेक जण त्यांना सोडून गेले माजी आमदार बापूसाहेब थिटे, पोपटराव गावडे , राजेंद्र जगदाळे, संतोष शितोळे, शरद कालेवार, मोनिकाताई हरगुडे, आरतीताई भुजबळ, श्रुतिकाताई झांबरे, अमोल वरपे, रंजन झांबरे, अविनाश मल्लाव असे कितीतरी मातब्बर कार्यकर्ते व पदाधिकारी  त्यांच्यापासून दूर गेलेत.
    जि. प. सदस्य राजेंद्र जगदाळे यांनीही आमदार पवार यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले गेली पाच वर्षे दबावात गेले फार ताणल्याने अखेर तुटले, आता मोकळे वाटते. हाजी हाजी करण्याचे दिवस आता गेले. तालुक्यात दुसरे नेतृत्व तयार होऊ नये म्हणून प्रयत्न केला गेला, ही परंपरा आता मोडीत निघणार जो काम करेल त्याला निश्चित संधी मिळणार, असा दावाही जगदाळे यांनी यावेळी केला. आम्हाला अजित दादा  कधीही भेटू दिले नाही, परंतु रवी बापू मुळे दादांना पाच वेळा भेटण्याचा योग आला त्यांना कामे सांगण्याची संधी मिळाली असेही यावेळी जगदाळे यांनी सांगितले.
  यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे  यांनी येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार हेच सक्षम नेतृत्व असेल असा विश्वास व्यक्त केला.
    गावडे यांनी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन केले व सूत्रसंचालन तज्ञिकाताई कर्डिले यांनी केले तर आभार संतोष शितोळे यांनी मानले.
0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *