छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत .सोयगांव येथे मोहनलाल हरणे तहसिलदार सोयगाव व मदन सिसोदिया तालुका कृषि अधिकारी सोयगाव यांच्या उपस्थितीत नवीन पंचायत समिती इमारत सोयगांव येथे दि. 27-12-2023 रोजी तालुक्यातील ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामस्तरीय समिती यांचे पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोहनलाल हरणे तहसिलदार सोयगांव यांनी रब्बी ई – पिक पाहणी या बाबतची माहिती दिली. एम एन सिसोदिया तालुका कृषि अधिकारी, सोयगांव यांनी पिक विमा योजनेची माहिती दिली. एस जि वाघ मंडळ कृषि अधिकारी बनोटी यांनी पिक कापणी प्रयोग करतांना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली. एच बि देशमुख कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय सोयगाव यांनी पिक कापणी प्रयोगाबाबतचे मार्गदर्शन केले. २०२३-२०२४ मध्ये रब्बी हंगामात वाटप करून देण्यात आलेल्या विविध पिकांच्या पिक कापणी प्रयोगांची माहिती दिली. गजानन जाधव विमा प्रतिनिधी सोयगांव यांनी पिक कापणी प्लॉटची आखणी विषयी माहिती दिली. आजच्या कार्यक्रमास जे.के.सुरे नायब तहसीलदार सोयगाव, संतोष भालेराव पंचायत समिती सोयगाव,आर जि गुंडीले मंडळ कृषि अधिकारी फर्दापूर,सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्तरीय समिती सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार ए एस बावस्कर कृषि सहाय्यक, धनवट यांनी केले.