बुलढाणा : बुलढाणा येथे क्रांतिकारी विचारांचे धनी मा.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनात परकायाप्रवेशी अद्वैती कथाकार बबनराव महामुने, हिवरा आश्रम यांनी सादर केलेल्या ‘ उलगडा ‘ या तत्कालीन मोगलाईतील बोलीभाषा तथा ग्रामीण जीवनावर आधारित कथेच्या प्रभावशाली आविष्काराने भारावून संमेलनाचे अध्यक्ष आयु. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या सह ज्येष्ठ कवी डॉ. सिध्दार्थ खरात मुंबई यांनी ‘ वन्स् मोअर ‘ ची विनंती केल्यावरून त्यांनी पुनश्च
ती कथा सादर केली आणि रसिक प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळविली. आणि सोबतंच साहित्य संमेलनांच्या इतिहासात कथेला पहिल्यांदा ‘ वन्स् मोअर ‘ ची साद घालीत नवा इतिहास घडला. विशेष महत्वाचे म्हणजे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बबनरावांना त्यांच्या या शैली संपन्न कथासादरीकरणाप्रीत्यर्थ साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट/डिलिट पदवी प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले असून तीच कथा त्यांनी बु. जि. स. संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदावरून पेश करून जी दाद मिळविली त्यामुळे पदवीदान सत्पात्री असल्याचे सिद्ध झाले. सदर प्रसंगी विचारपीठावर सुप्रसिद्ध कथाकार मा. संदीप गवई, मा. किसन पिसे तथा सूत्रसंचालक या नात्याने हरहुन्नरी साहित्यिक डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली सह डॉ. लता बाहेकर, डॉ. मंजुताई जाधव, ज्येष्ठ कवयित्री वैशाली तायडे, कविवर्य अरविंद शिंगाडे,
ज्येष्ठ कवयित्री ॲड. रजनी बावस्कर, ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण, कवी नंदी यांच्या सह साहित्यिक क्षेत्रातील गुणी कलावंत मंडळी उपस्थित होती.