शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त रविवारला हे संमेलन नुकतेच उत्साहात व थाटात संपन्न झाले. या संमेलनाच्या कवी संमेलनात कै.डॉ. गिरीश खारकर काव्य व्यासपीठावर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष तथा संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अमरावती येथील डॉ. सतिश तराळ, स्वागताध्यक्ष मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख, कार्याध्यक्ष युवा संसद संस्था अमरावतीचे अध्यक्ष नितीन पवित्रकार , संयोजक प्रा. डॉ.मंदा नांदुरकर, संमेलनाचे निमंत्रक डॉ. मंगेश निर्मळ अमरावती, सहसंयोजक प्रा. डॉ. गजानन घोंगटे, वाशिम सहकार्याध्यक्ष प्रा.आनंद महाजन, अमरावती सह निमंत्रक गजानन इटनारे अमरावती, उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, फाउंडेशनच्या कार्यकारणी खजिनदार प्रमोद पिवटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील डॉ. शिवाजी शिंदे, छत्रपती संभाजी नगर येथील एडवोकेट सर्जेराव साळवे, अमरावती येथील डॉ. श्यामसुंदर निकम, श्रीमती नीलिमा ताई भोजने चिखली, मेहकर येथील शाहीर मनोहर पवार, निवृत्ती जाधव, हिवरा आश्रम येथील डॉ. पंढरीनाथ शेळके, धाराशिव येथील डॉ.मधुकर हुजरे, पुणे येथील रामचंद्र गुरव, अकोला येथील डॉ. विनय दांदळे, श्रीमती शितल शेगोकार, श्रीमती पुजाताई खेते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब बुके प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह व उज्जैनकर फाउंडेशनची दिनदर्शिका भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी फाउंडेशनचे कार्यकारणी सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे, राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल, राज्य सल्लागार अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक सुरेश पाचकवडे, राज्य सहसचिव डॉ. अशोक शिरसाठ, राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत , राज्य खजिनदार रामदास कोरडे ,अकोला जिल्हा संपर्कप्रमुख निलेश सोनी, महिला संपर्कप्रमुख प्रमुख प्राचार्या डॉ. लता थोरात, अकोला जिल्हा अध्यक्ष अमोल अनासने, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार व शंकरराव अनासने , जिल्हा सदस्य बाळूभाऊ ईटणारे, जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष मधुकरराव पोतदार, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मनोहरराव रोकडे, मुक्ताईनगर येथील राजधर सेट सोनार, कडू महाराज, संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे, परभणी येथील का.रा. चव्हाण, अमरावती येथील डॉ. योगिता पिंजरकर, वर्षा पत्की, श्रीकृष्ण कुलट ,अतुल ठाकरे ,विशाल मोहोळ, संदीप देशमुख, कल्पना विघे, मदन गवळी, राजेश महलले, बबलू कराळे, छाया पात्रे ,शितल राऊत, शिमरेला देशमुख ,जयश्री कोळी, रंजना कराळे ,सुरेश देशमुख, गीता निर्माण, सुनील वाडे पुष्पाताई साखरे विशाल कंन्हेरकर सर्व अमरावती नांदुरा येथील शालिग्राम वाडे लोणार येथील डी.आर. बांगर जळगाव येथील रमेश उज्जैनकर मुक्ताईनगर येथील कडू महाराज यवतमाळ येथील नरेंद्र विझे अकोला येथील अमिता काटोल मुर्तीजापुर येथील प्रा. वर्षा कावरे आदींनी आपल्या कविता सादर केल्या. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह भेट देऊन मान्यवर कवींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अॅड सर्जेराव साळवे यांनी भृणहत्या रोखण्यासाठी प्रबोधनात्मक ” आई मला तू जगात येऊ दे, आई ग माझा जन्म होऊ दे.” ही कविता सादर करून सर्वांना स्तब्ध केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना “आहे प्रयत्न आमुचा सुरू, देश कॅन्सर मुक्त करु”. हे गीत सादर केले. तसेच शाहीर मनोहर पवार, डॉ. निवृत्ती जाधव, अॅड. सर्जेराव साळवे आणि सहकार संघाने ” गर्जा महाराष्ट्र माझा” ह्या गीत गायनाने साहित्य रसिकांमध्ये स्फुर्ती निर्माण केली व प्रशंसा मिळवली.
याप्रसंगी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी सुरेल सूत्रसंचालन केले. या संमेलनाला शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व राज्यातील विविध जिल्ह्यातील फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.