वैनगंगा नदी पात्रात रेती तस्करावर छापा.

Khozmaster
1 Min Read
भंडारा जिल्हा अंतर्गत येत असलेल्या पवनी पोलीस स्टेशन द्वारा दिनांक २७ डिसेंबर २०२३ चे रात्री १ च्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा घातला असता ट्रॅक्टर चालक हे वैनगंगा नदीपात्राकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर १० किलोमीटर पूर्वेस असलेल्या गुडेगाव येथील वैनगंगा नदीपात्रातून चोरट्या स्वरूपात रेतीचे उत्खनन करून डम्पिंग करण्याच्या उद्देशाने व डम्पिंग केलेली रेती जेसीबी च्या सहाय्याने टिप्पर मध्ये भरून त्या रेतीचा चोरट्या स्वरूपात वाहतूक करण्याच्या उद्देशाने घटना ठिकाणी मिळून आल्याने यातील आरोपी चालक मालका विरुद्ध सरकार तर्फे फिर्याद पोलीस उपनिरीक्षक, निखिल रहाटे, वय 32 यांनी पोलीस स्टेशन पवनी, जिल्हा भंडारा येथे अपराध क्रमांक ४६४/२०२३ कलम ३७९,५११,१०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुनील राऊत हे करीत आहे.
0 9 3 7 9 8
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *