अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या भंडारा गोंदिया प्रभारी पदी प्रवीण शेंडे यांची नियुक्ती.

Khozmaster
1 Min Read
गोंदिया (संजीव भांबोरे )अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या भंडारा गोंदिया प्रभारी पदी तिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण हरिदास शेंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वरील नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .प्रवीण शेंडे यांनी यापूर्वी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे बहुजन समाज पार्टीचे अध्यक्षपद ,रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन उपाध्यक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तिरोडा सहसचिव ,उपाध्यक्ष तिरोडा शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे पदे भुसविली आहेत. आता त्यांनी अंध, अपंग ,मूकबधिर ,कर्णबधिर इत्यादी लोकांच्या हक्कासाठी आपण सतत लढा देत राहणार यावेळी त्यांनी सांगितले .त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत.
0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *