प्रतिनिधी .संजय धाडवे .शाहीर परिषद, तमाशा परिषद, टुरिंग टॉकीज, एकपात्री कलाकार, साऊंड लाईट असोसिएशन, बॅकस्टेज कलाकार, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, विजय पटवर्धन फाउंडेशन, मराठी चित्रपट असोसिएशन, नृत्य परिषद, अखिल भारतीय निर्माता महामंडळ, विदर्भातील झाडेपट्टी संघटना, जादूगारांची संघटना शा अनेक संघटनेने*) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, त्या शिष्टमंडळाच्या समोरच अजित दादा यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य प्रधान सचिव विकास खारगे साहेब यांच्याशी फोन वरून संपर्क साधला व कलाकारांच्या बाबतीत गेले अनेक वर्ष असलेले प्रलंबित विषय वाचून दाखविले, त्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब यांनी काल मुंबई येथे त्यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी संस्कृतिक कलाकारांची शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये खालील विषयी घेण्यात आले…
1)वृद्ध कलावंत यांच्या पेन्शन मध्ये वाढ करावी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यासाठी लागणारा 48 हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला ही अट कमी करून ती एक लाख रुपये उत्पन्नाचा दाखला करावी,
2) टुरिंग टॉकीज म्हणजे तंबू थिएटर महाराष्ट्रात गावोगावी मराठी चित्रपट पोचवण्याचं काम हे उत्तम रित्या करत असतात पण गेले अनेक वर्षे ते तंबू थेटर हे नामशेष होताना दिसत आहे त्यांना पुनर्जीवित करण्याकरिता त्यांना वार्षिक दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे व महाराष्ट्र शासनाच्या सर्व खात्याच्या जाहिराती आहेत त्याच प्रक्षेपण त्या तंबू थिएटर मध्ये दाखविण्यात यावे
3) मुंबई पुणे येथे कलाकारांना शूटिंगसाठी आल्यानंतर तिथे राहण्यासाठी सोय नसते, त्यांना हॉटेलमध्ये राहण परवडत नाही, हॉटेलमध्ये राहणे इतपत त्यांना मानधन देखील नसतं, त्या कलाकारांसाठी कलाकार भवन उभा करावा
4) आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा मध्ये उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी देखील महाराष्ट्र शासन पाठपुरावा करणार आहे
5) मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील सांस्कृतिक संचालया चे एक मध्यवर्ती ऑफिस पुण्यात चालू करावे व त्या ऑफिसच्या माध्यमातून सांस्कृतिक खात्याच्या संदर्भात ज्या काही परवानगी असतील त्या तिथून मिळाव्या यासाठी सांस्कृतिक संचालनालयाचे ऑफिस लवकरात लवकर पुण्यात सुरू करावे अशी मागणी केली,
6) सिंगल थेटरच्या संदर्भात ज्या काही जाचक अटी आहेत किंवा थेटर मालकांना त्यांच्याच थिएटरमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे,नियम आहेत त्या संदर्भात काही जाचक अटी आहेत त्या दूर कराव्यात
अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर खारगे साहेबांनी हे सगळे विषयी व्यवस्थित समजून घेतले ऐकून घेतले आणि या सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले प्रामुख्याने वृद्ध कलावंतांचा पेन्शन वाढीचा विषय असेल तो टूरिंग टॉकीजच्या मालकांना अनुदान देण्याचा विषय असेल किंवा मुंबईमध्ये कलाकार भवन कलाकारांना राहण्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे अशा अनेक गोष्टींवर सकारात्मक चर्चा खारगे साहेबांनी केल्या, व त्या लवकरात लवकर कशा होतील यावर देखील त्यांनी संबंधित त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, या चर्चेवेळी महाराष्ट्र शासनाचे मुख्य प्रधान सचिव विकास खारगे साहेब, त्याचबरोबर सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे साहेब, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील ,ज्येष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश सुपेकर, अखिल भारतीय मराठी निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, अभिनेत्री स्वाती हनमघर उपस्थित होते,