छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.रोटेगाव येथे लवकरच जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस सुरू होत आहे,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोटेगाव हे रेल्वे स्टेशन वैजापूर साठी आहे, वैजापूर -रोटेगाव अंतर फक्त दोन ते अडीच किलोमीटर आहे,आता तर वैजापूरचा विस्तार रोटेगाव रेल्वे स्थानक पर्यंत पोहचला आहे,वैजापूर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे तालुका ठिकाण आहे,अनेक उपविभागीय कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय,मोठमोठया बँका, उद्योग व विकसित तालुका साखर कारखाने, रोटेगाव रेल्वे स्टेशन जवळ होऊ घातलेली एम, आय,डी,सी
दोन मेडिकल कॉलेज,दोन अग्रीकलचर कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ,बी,फार्मसी कॉलेज,नर्सिंग कॉलेज आहेत, दररोज मुंबई,नाशिक, औरंगाबाद, जालना, शी शेकडो प्रवाशांचा,व्यापारी,व्यापारी, उद्योगपती ,विद्यार्थी यांचा संबंध आहे,रोटेगाव हे द,म,रे चे सर्वाधिक महसूल देणारे रेल्वे स्टेशन आहे ,असे असताना वंदे भारत या एक्सप्रेस रेल्वेचा थांबा या स्थानकाला देऊ नये हे वैजापूर चे दुर्दैव आहे,आमच्या मराठवाडा विभागातील जालन्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना,राबसाहेब दानवे
यांनी आपले वजन वापरून व मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांचा विचार करून जास्तीत जास्त सोयी -सुविधा मिळवून द्यायला हव्यात, लासुर स्टेशन व रोटेगाव ला त्यानी वंदे भारत या एक्सप्रेस रेल्वे चा रोटेगाव थांबा (वैजापूर)ला मिळवून द्यावा व ईतर रेल्वेचे ही रोटेगावला थांबे द्यावेत अशी अपेक्षा व विनंती आहे,
धोंडीरामसिंह ध राजपूत,वैजापूर जि,औरंगाबाद