नागपूर,31 डिसेंबरला अनुज्ञप्तीनिहाय शिथिलता मद्यसेवन परवान्यासाठी संकेतस्थळावर संपर्क करा नागपूर,दि. 27 : जिल्ह्यातील विविध मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद करावयाच्या वेळेत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 31 डिसेंबर रोजी अनुज्ञप्तीनिहाय शिथिलता देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त ऑनलाईन पध्दतीने संकेतथळावरुन विशेष कार्यक्रमासाठी एक दिवसीय परवाने तसेच मद्यसेवन परवाना आवश्यक शुल्क भरुन उपलब्ध करुन देण्याची सोय करण्यात आली आहे. एक दिवसीय परवान्यासाठी exciseservice.mahaonline.gov.in राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ आहे. परवान्याशिवाय मद्य दिले गेल्यास त्यावर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पूर्व तयारी केली असून विनापरवाना मद्य वाटप करणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाने 8 विशेष पथकांची नियुक्त करण्यात आले आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त, मोहिम व धाडसत्राचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात1 एप्रिल ते 20 डिसेंबर या कालावधीत 2 हजार 416 गुन्हे नोंदविले असून 2 हजार 439 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1 कोटी 94 लाख 46 हजार 247 इतक्या किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक विक्रीबाबत सूचना देण्यासाठी विभागामार्फत टोल फ्री क्रमाक 18002339999 असून व्हॉटस्ॲप क्रमांक 8422001133 असा आहे. नागरिकांनी यावर माहितीसाठी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची माहिती गोपनिय ठेवण्या येईल.