बळीराजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी “शेतकऱ्याचा आसूड” हा क्रांतिकारी ग्रंथ लिहिला.
शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर मार्गक्रमण करत असताना पळसदेव (इंदापूर) येथील श्री. छगन बनसुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हा “शेतकऱ्याचा आसूड” भेट दिला.
आसूड हे शेतकऱ्याचे शस्त्र असून आमच्या शेतकरी बांधवांनी दिलेल्या भेटीमुळे हा लढा लढण्यासाठी आमचे हात अधिक बळकट झाले आहे.
येत्या काळात आपल्या सर्वांना मिळून सरकारच्या सुलतानी कारभारावर संपूर्ण ताकतीने हा आसूड ओढायचा आहे !