कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गोकुळ दूध संघाच्या सहयोगातून जातिवंत दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी ५०० कोटी रुपये अर्थसाह्याची तरतूद करून ठेवली आहे. या योजनेअंतर्गत पर राज्यातील जातिवंत दुधाळ म्हशी खरेदी करून दूध संकलन वाढवा,असे आवाहन केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या ३० हजार अनुदानाचा लाभ घ्या, असेही सांगितले.
कागलमध्ये आयोजित म्हैस खरेदी करणाऱ्या मळगे खुर्द ता. कागल येथील श्रीराम दूध संस्थेच्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगे खुर्द ता. कागल येथील सुभाषराव चौगुले होते. यावेळी संस्थेच्या १५ सभासद शेतकऱ्यांना ३० म्हशींच्या खरेदीसाठी ३९ लाख रुपये अर्थ सहाय्याची मंजुरीपत्रे देण्यात आली.
उसाच्या बरोबरीनेच कोल्हापूर जिल्ह्यात दूध व्यवसायही वाढत आहे. शेतकऱ्यांचा उसासारखाच तो मुख्य व्यवसाय बनला आहे. केडीसीसी बँकेने गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार केलेला आहे. या कराराअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ओबीसी विकास महामंडळ या माध्यमातून पर राज्यातील दुधाळ म्हशी खरेदी साठी दोन लाख साठ हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळते. शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाकडून प्रत्येक म्हशी पाठीमागे तीस हजार रुपये अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन दूध संकलन वाढवावे, असेही सांगितले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.