प्रविण जगताप
वर्धा प्रतिनिधी . विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने दिनांक २७ डिसेंबर २०२३ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे नागपूर येथील ” संविधान चौकात” माजी आमदार श्री ऍड वामनराव चटप यांचे नेतृत्वात १) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा.
२) विज निर्मिती हि विदर्भात होत असल्याने येथील ग्राहकांना विजेचे दर निम्मे करा.
३) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नी छत्तीसगड राज्यात हमी भावापेक्षा ४० % जास्त दर देवून धानाची खरेदी, तर मध्यप्रदेशात हमीभावात ३०% जास्त दर देवून गहू खरेदी ची घोषणा नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सीसीआय व्दारे कापसाचे हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करावी. या व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या “आमरण उपोषणाचे” समर्थनार्थ जाम चौरस्ता ता. समुद्रपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने दुपारी १ वाजता स्वभाप प्रदेशाध्यक्ष श्री मधुसूदन हरणे, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख श्री उल्हास कोंटबकर, स्वभाप जिल्हा अध्यक्ष श्री अजाबराव राऊत, डॉ.हेमंत इसनकर यांचे नेतृत्वात “रस्ता रोको” आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून समुद्रपूर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले, तिथे शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सौ सरोजताई काशीकर, सुनंदा तुपकर यांनी भेट दिली.
या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे श्री अनीलभाऊ जवादे, शेतकरी संघटना तालुका प्रमुख श्री सुनील हिवसे, श्री जिवन गुरनूले, बाजार समिती संचालक श्री मनीष निखाडे, राजू झोटींग, डॉ पोफळे, संजय पाटील, महेश माकडे, सौ लता सुकळकर, सौ शालीनी साळवे, मोरेश्वर वाघमारे, प्रविण भोयर, भारत चौधरी, अभिजीत लाखे, संदीप ठाकरे, संजय बांगडे, कमलाकर बोरकर, सुखदेव पाटील, विजय धोटे, पंकज पुसदेकर, रोहीत हरणे, सचीन डाफे, डॉ. सुपारे, राजू नगराळे, नितीन भगत, विजय किलनाके, दशरथ धोटे, पंकज गावंडे, हेमराज ईखार, आकाश वलके, प्रतीक पाझारे, प्रशांत किलनाके, पंकज पुसदेकर, दामू वादाफळे, विठ्ठल धोटे,नामदेव मानकर, संजय टाले, अरविंद बोरकर, किसनाजी शेंडे, नारायण घ्यारे, यांचे सह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.