प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी संघटित प्रयत्न करा-धोंडीराम राजपूत

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर.
जागतिक आरोग्य संघटनेने २०३०पर्यंत जग क्षयमुक्त
करण्याचा संकल्प केला  असला तरी भारत देश मात्र २०२५पर्यंतच क्षयमुक्त करण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी केला असल्याने संपूर्ण देशवाशियानी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे,असे प्रतिपादन  जिल्हा आरोग्य देखरेख समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी लासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित क्षयरुग्णांना सकस आहार किट वाटप प्रसंगी गुरुवार (ता,२८)रोजी केले, या प्रसंगी अध्यक्ष स्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,अभय धानोरकर व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ,गणेश
कल्याणकर होते  मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या समनवयक अन्नपूर्णा ढोरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ,टी, पी,तुपे होते,मराठवाडा  ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांनी लासुर रुग्णालय अंतर्गत येणाऱ्या  ग्रामीण भागातील ५०क्षयरुग्णांना सकस आहार फूड किट वाटप कार्यक्रम आयोजित केला त्याप्रसंगी राजपूत बोलत होते,ते पुढे म्हणाले की,वर्ष२०२५पर्यंत क्षयमुक्त भारत करण्यासाठी आरोग्य खात्याच्या सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स,आशा वर्कर्स यांनी ही सर्वंकष प्रयत्न करायला हवे,उपस्थितीत क्षयरुग्ण यांनी सकस आहार घेऊन प्रतिकार शक्ती वाढवावी ,वेळोवेळी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात,गोळ्या औषधी वेळेवर घ्यावी व देशातून क्षय आजार २०२५  पूर्वी पळवून लावावाअशी अपेक्षा केली,,एम ,जी,व्ही, एस संस्थेच्या अन्नपूर्णा ढोरे यांनी संस्थेचे विविध उपक्रमांची माहिती दिली,व आणखी ही फूड किटस देण्यात येतील असे विशद केले, डॉ,धानोरकर ,डॉ कल्याणकर यांनी ही उपस्थितांना क्षयरोग व घ्यावयाच्या काळजी बाबल मार्गदर्शन केले गणेश कल्याणकर यांनी  ही, निक्षय मित्र बनण्याची प्रक्रिया विशद केली,या प्रसंगी पन्नास
लाभार्थीना फूडपाकेट्स वाटप केले,या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ,चाटे,डॉ,सुर्यवंशी, उपस्थित होते तसेच आशा वर्कर्स,तसेच नर्सेस,व क्षयरुग्ण लाभार्ती
उपस्थित होते,
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *