छत्रपती संभाजीनगर उपसंपादक गोकुळसिंग राजपूत.सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यासाठी सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अशी माहिती सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी बोलताना सांगितले.ते पुढे म्हणाले की हे अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार दि.४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सन २०२३-२४ साठी शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रास गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सायं. सव्वा सहा वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड पुणे – ४११००१ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुवे-रोजगार) या संकेत स्थळाला भेट द्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व अर्ज करावेत आयुक्त, समाज कल्याण ओमप्रकाश बकोरीया आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर श्रीमती जयश्री सोनकवडे सांगितले आहे या संधीचा जास्तीच जास्त फायदा घ्यावा असे आवाहन सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे