वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; रीसोड येथे बुधवार दिनांक २८,रोजी महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी अंतर्गत गुणवंत शिक्षण संस्था,वाशीम च्या वतीने तहसील कार्यालय रिसोड येथे एच आय व्ही/ एड्स वर जनजागृती करण्यासाठी, पथ् नाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा जनजागृती पथनाट्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन अनिल कावरखे सर ,
जिल्हा एड्स प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रवी भिसे व संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती शिरसाठ मॅडम यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आला.
या पथनाट्याच्या कार्यक्रमाला रिसोड तहसीलच्या मुख्य तहसीलदार सन्माननीय प्रतीक्षा तेजनकर मॅडम उपस्थितीत होत्या. तहसीलदार मॅडम यांनी कार्यक्रम स्थळी येऊन संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रज्ञानंद भगत आणि त्यांचा संच यांनी पथनाट्याचे सुंदर रित्या सादरीकरण केले.
यावेळी संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयकशांताराम गायकवाड, सुपरवायझर रामेश्वर सरकटे, रिसोड सामान्य रुग्णालयाचे सी.टी.सीे.समुपदेशक अंजली गायकवाड मॅडम, लॅब टेक्निशियन् सुधाकर निखाडे, लिंक वर्कर गिरीधर शेजुळ, विद्या कास्ते, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या पथनाट्याच्या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्तरावजी धांडे साहेब,संजय कांबळे (प्रेसिडेंट) दिनकर बोडखे (पत्रकार) , देवानंद मोरे, अल्ताफ भाई घनकर्, संजय भाऊ अंभोरे, गजानन नाईककवाडे, कैलास कराड, संजय पंडित इत्यादी मान्यवर व असंख्य नागरिक उपस्थित होते.