गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या नवनिर्वाचित प्रदेश मंत्री कु.वैभवी ढीवरे यांचा जालना प्रवास झाला.प्रवासात मा.जिल्हाधिकारी डॉ कृष्णकांत पांचाळ, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री व शहरातील हितचिंतक, कार्यकर्ते, स्थायी कार्यकर्ते सर्वांच्या घरी भेट दिल्या. नुकताच झालेला दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात पारित झालेल्या शैक्षणिक, सामजिक सद्यस्थिती वरील प्रस्तावांची प्रत देण्यात आल्या. वैभवी ढीवरे यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्ह्यातील शैक्षणिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच पुढील काळात अभाविपचे उपक्रम, कार्यक्रम व २५ ते ३१ डिसेंबर या काळात होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह अश्या विषयांवर मा. जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थी अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण या विषयांवर चिंता व्यक्त केली. पुढे जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांच्या सोबत सुद्धा अनेक शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर पुढील योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अभाविप जालना शहर अध्यक्ष प्रा.वैभव अंबरवाडीकर,जालना शहर कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा.अरुणा माहरोळकर जालना शहर मंत्री ऋग्वेद शिपोरकर, जिल्हा सह संयोजक सागर मांडे, प्रतिक कुलकर्णी, वैष्णवी बावकर, अर्चना कुलकर्णी, अश्विनी वाघ, गणेश बोंडे, अनुराग संगमुळी व कार्यकर्ते उपस्थित होते.