सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत . सोयगाव;कृषि विभागामार्फत रब्बी हंगामा अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धे साठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सोयगाव तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी मदन शिसोदिया यांच्या मार्फत करण्यात आले आहे. सर्वसाधन व आदिवासी गटात ही स्पर्धा होईल. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी रब्बी पीक स्पर्धा होणार आहे. स्पर्धे त भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धे त भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये, आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी संबंधित तालुका
कृषि मदन सिसोदिया अधिकारी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषि विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कृषि अर्जुन सुरडकर, कृषी सहाय्यक मानसिंग भोळे यांनी केले आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची
छायांकित प्रत अशी आहे बक्षिसांची रक्कम रब्बी पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपयांचे राहील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये, द्वितीय बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये राहील. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये, द्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तिसरे बक्षीस तीस हजार रुपये राहणार आहे.तरी सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तच जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक मानसिंग भोळे, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर यांनी केले आहे.
Users Today : 1