प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.देश सेवेसाठी आपली 34 वर्ष सेवा देऊन 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत असलेले कर्नल, विकास वर्मा हे मागील दोन वर्षापासून उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया, नागपूर येथे ‘कर्नल वेटरन’ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी गौरव सेनानी तसेच त्यांच्या परिवारा करिता बरीचशी कल्याणकारी कामे केलीत.ज्यामध्ये सब एरिया मार्फत पूर्वसैनिकांकरिता रोजगार, स्पर्श बद्दल आलेल्या अडचणी,ECHS बद्दल तक्रारी तसेच अन्य कोणत्याही समस्या बाबतचे निवारण ही सर्व कामे मोठ्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलीत . इतकेच नसून सध्या ‘डिजिटल लिटरसी ट्रेनिंग प्रोग्राम’ चे सुद्धा त्यांनी आयोजन केले आहे.
पुनरनियुक्ती म्हणून त्यांना ऑफिसर इन्चार्ज, स्टेशन हेडकॉटर, भुसावळ, बुलढाणा, जळगाव येथे नियुक्त करण्यात आले आहे.
आज त्यांच्या कार्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे नागपुरातील भूतपूर्व सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी जीवनास तसेच पुढील आयुष्या करिता शुभेच्छा दिल्यात. यावेळी इंडियन एक्स सर्विसमॅन मुहमेंट चे संयोजक, विलास दवणे ,सहसंयोजक संजय लोखंडे व संजय जाधव अमर जवान स्मारक समिती, फुले मार्केट चे अध्यक्ष, अरुण कामेलकर, उपाध्यक्ष, विजय मालेवार, सचिव, सुभाष बोबडे, गौरव सेनानी सिग्नल असोसिएशनचे उपाध्यक्ष पांडुरंग खराबे, एक्स सर्विस मॅन न्यूज चे निलेश व्यास, इवान वायुसैनिक संघटनेचे अध्यक्ष, लक्ष्मीकांत नांदुरकर, एअर फोर्स असोसिएशनच्या श्रीमती. संजीवनी येवले तसेच वेटरण न्यूज चॅनेल चे अनिल बालपांडे यांच्यासह अनेक माजी सैनिक तसेच कार्यालयातील कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.