नागपूर :कोरोना जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेत मनपा कार्यक्षेत्रातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज कोरोना विषाणूच्या जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. तरी जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून, कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले आहे.
कोरोनाच्या जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना संदर्भात शुक्रवार (ता.२९) रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, एम्स नागपूरच्या डॉ. मीना मिश्रा, नीरीचे डॉ. कृष्णा खैरणार, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्यालयाचे डॉ. नितीन शेंडे, डॉ.संजय गुज्जनवार, मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोना साखळीवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे सांगत. सर्वप्रथम कोरोना संशयीत तसेच सौम्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक असून, आरोग्य विभागाने अधिकाधिक चाचणी करण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले. याशिवाय रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटला न घाबरता सतर्कता बाळगावी सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती गोयल यांनी केले.
नागपूर शहरात आज ११ रुग्णांची नोंद झालेली असून २२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यापैकी ४ रुग्ण रुग्णलयात असून त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. मात्र १८ रुग्णांना सौम्य लक्षणे असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आरोग्य विभागामार्फत सर्व कोव्हिड रुग्णांच्या घरी भेट देऊन निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात येत आहे. यासोबतच कोव्हिड रुग्णांवर आवश्यक औषधोपचार देखील करण्यात येत आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा आरोग्य विभाग आणि प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या ४६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करण्याचे आवाहनही अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले.
कोव्हिड RT-PCR चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोन
खामला यु.पी.एच.सी. खामला, नागपूर
कामगार नगर यु.पी.एच.सी. कामगार नगर, नागपूर
जयताळा यु.पी.एच.सी. जयताळा , नागपूर
सोनेगाव यु.पी.एच.सी. सोनेगाव, नागपूर
धरमपेठ झोन
फुटाळा यु.पी.एच.सी. गल्ली नं.03 अमरावती रोड फुटाळा, नागपूर
डीक यु.पी.एच.सी. व्ही.आय.पी. रोड वनामती जवळ , नागपूर
तेलंगखेडी यु.पी.एच.सी. सुदाम नगरी वर्मा लेआऊट अंबाझरी , नागपूर
के.टी. नगर यु.पी.एच.सी. के.टी. नगर , नागपूर
हजारी पहाड यु.पी.एच.सी. हजारी पहाड लायब्ररी , नागपूर
दाभा यु.पी.एच.सी. जुना चुंगी नाका नं.01 दाभा वॉटर टॉक जवळ दाभा चैाक काटोल बायपास रोड , नागपूर
हनुमान नगर झोन
सोमवारी क्वॉटर यु.पी.एच.सी. गजानन मंदिर जवळ सोमवारी क्वॉटर, नागपूर
मानेवाडा यु.पी.एच.सी.शाहु नगर, नागपूर
हुडकेश्वर यु.पी.एच.सी. नासरे सभागृह समोर शिवाजी कॉलनी, नागपूर
नरसाळा यु.पी.एच.सी.नरसाळा ग्रामपंचायत जवळ, नागपूर
धंतोली झोन
कॉटन मार्केट यु.पी.एच.सी.आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा, नागपूर
बाबुलखेडा यु.पी.एच.सी.पंचशील नाईट शाळे जवळ रामेश्वरी रोड, नागपूर
चिंच भवन यु.पी.एच.सी.दत्त मंदिर झेंडा चौक जवळ चिंच भवन वर्धा रोड, नागपूर
नेहरू नगर झोन
नंदनवन यु.पी.एच.सी. दर्शन कॉलनी, नागपूर
बीडीपेठ यु.पी.एच.सी.त्रिकोणी मैदान बिडी पेठ, नागपूर
ताजबाग यु.पी.एच.सी.पिली स्कुल मोठा ताजबाग , नागपूर
दिघोरी यु.पी.एच.सी.जिजामाता नगर, नागपूर
भांडेवाडी यु.पी.एच.सी.संघर्ष नगर वाठोडा, नागपूर
गांधीबाग झोन
महाल रोग निदान केंद्र कोतवाली पोलिस स्टेशन जवळ, नागपूर
भालदारपुरा यु.पी.एच.सी.गंजीपेठ फायर स्टेशन जवळ ,नागपूर
मोमीनपुरा यु.पी.एच.सी. एम. एल कॅन्टीन जवळ, नागपूर
सतरंजीपुरा झोन
शांती नगर यु.पी.एच.सी.मुदलीयार चौक शांती नगर, नागपूर
जागनाथ बुधवारी यु.पी.एच.सी.तबला मार्केट जागनाथ बुधवारी , नागपूर
मेंहदीबाग यु.पी.एच.सी. मेंहदीबाग, नागपूर
कुंदनलाल गुप्ता नगर यु.पी.एच.सी.एन.आय.टी ग्राऊड पंचवटी नगर , नागपूर
बिनाकी यु.पी.एच.सी.खैरीपुरा लालबाग, नागपूर
सतरंजीपुरा यु.पी.एच.सी.बैडमिंटन हॉल सतरंजीपुरा, नागपूर
लकडगंज झोन
हिवरी नगर यु.पी.एच.सी. पावर हाऊस हिवरी नगर , नागपूर