*महिलांनी सक्रीय राजकारणात उतरून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे…* *रूचिता अमित नाईक, शिवसेना महिला शहर प्रमुख*

Khozmaster
1 Min Read
नालासोपारा पश्चिम येथे विभाग प्रमुख गणेश मुनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मार्गदर्शन व सदस्य नोंदनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 यावेळी महिलांना शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गदर्शन केले.
महिलाविषयी दृष्टीकोन  बदलण्याची गरज  असुन केवळ महिलांना आरक्षण आहे म्हणुन संधी मिळण्यापेक्षा त्या कर्तुत्वान व सक्षम आहेत म्हणून राजकारणात त्यांना संधी मिळाली पाहिजे स्त्री  आणि पुरूष अशी तुलना  होणे देखिल चुकीचे आहे एक महिला पक्षात आली तर संपुर्ण कुटूंब पक्षाशी जोडले जाते.
यावेळी रूचिता नाईक बोलताना म्हणाल्या की महिला हि एक अशी शक्ती आहे की सर्व शक्तीचा सामना करण्याची ताकत तिच्यामध्ये असते. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.
महिलांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात महिला संघटना मजबूत करून महापालिका निवडणुकीत सज्ज ठेवणार असल्याचे त्या बोलल्या मुख्यमंत्री यांचे काम घरा घरात पोहचवून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहे व येणारी महापालिका निवडणुकीत हि निश्चितपणे शिवसेना  व भाजपा जिंकेल.
असा विश्वास रूचिता नाईक यांनी व्यक्त केला यावेळी विभागप्रमुख गणेश मुनगेकर शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *