अवैध रेती वाळू चोरणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत कारवाई

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.पोलीस स्टेशन, भिवापूर येथील कर्मचारी दिनांक २९ डिसेंबर २०१३ रोजी रात्री २३.१५ दरम्यान परिसरात पेट्रोलिंग करत असताना मौजा. महसूल चेक पोस्ट नाका, भिवापूर गावाजवळ भिवापूर ते उमरेड या हायवे वर नागपूरकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच ४९-एटी -९७९० ला थांबवून पाहणी केली असता ६ ब्रास रेती आढळून आली. वाहक नामे विनोद तामसिंग मडावी, वय ३२ वर्ष रा. गोवारी, ता. धानोरा, जि. शिवनी (एमपी) हल्ली मुक्काम दिघोरी चौक, नागपूर याला याबाबत चौकशी केली असता वाहकाकडे कुठल्याही प्रकारचा परवाना (रॉयल्टी) नसल्याचे आढळून आले. सखोल चौकशी अंती त्याने सदर रेती ही सागर साखरे, वय ३५ वर्ष, रा. उमरेड यांच्या मालकीची असून त्यांच्या सांगण्यावरून ही रेती मौजा नांद तालुका पवनी जिल्हा भंडारा या गावातून भरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे सदर 10 चक्का टिप्पर किंमत २० लाख तसेच ६ ब्रास रेती किंमत ३० हजार रुपये असा एकूण २०,३०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध रित्या विनापरवाना शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने सदर टिप्पर चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ३७९,१०९ भा.द.वी सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक, हर्ष ए पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक, संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार, प्रमोद चौधरी, सहाय्यक फौजदार ,अशोक सिंग ठाकूर, पोलीस अंमलदार, मनोज चाचरे, चालक बांते यांनी पार पाडली.
0 9 3 8 1 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *