गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे, निवेदनात पुढे म्हटले आहे कि, परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप नोंद घेऊन उसाचे गाळप करण्यासाठी तसेच आम्हाला ३ टप्प्यात उसाचे पैसे द्या असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने सहमती पत्र व उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याची यंत्रणा लिहून घेत आहे, पहिला हप्ता २७०० रुपये द्या, मागच्या २ वर्षात एकरी १० हजार रुपये घेतलेले साखर कारखान्याने परत दिले नाहीत या बाबत कारखान्याने कोणता ही खुलासा केलेला नाही, म्हणून या विषयाची चौकशी करण्यासाठी मा. साखर आयुक्त यांनी चौकशी समिती नेमून बागेश्वरी साखर कारखान्यावर कारवाई कारवाई केली पाहिजे कारण श्रद्धा सुगर एनर्जी मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याने मागच्या वर्षी बागेश्वरी साखर कारखान्याच्या प्रोग्राम नुसार २ महिने उशिराने ऊस गाळप केला होता, महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. नुसार एक रकमी बागेश्वरी साखर कारखान्याने पैसे दिले पाहिजे परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप नोंद घेऊन उसाचे गाळप करण्यासाठी तसेच आम्हाला उसाचे पैसे द्या असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने सहमती पत्र व उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याची यंत्रणा लिहून घेत आहे, मागच्या दोन वर्षात एकरी १० हजार रुपये घेतलेले साखर कारखान्याने परत दिले नाहीत या बाबत साखर कारखान्याने कोणताही खुलासा केलेला नाही, म्हणून या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी. कारण बागेश्वरी साखर कारखान्याकडे ज्या शेतकऱ्यांची हंगाम २०२३/२०२४ या कालावधीत उसाचा भाव जाहीर केलेला नाही, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आम्हाला तीन टप्प्यात बागेश्वरी साखर कारखाने पैसे दिले तर मान्य आहे, असे सहमती पत्र जबरदस्तीने साखर कारखान्यांची शेतकी यंत्रणा संबंधित शेतकऱ्यांकडून लिहून घेत आहेत, या बाबत कारवाई होणे अपेक्षित आहेत कारण बागेश्वरी साखर कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांना वेठीस धरून आपला फायदा लक्षात घेऊन जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत, कारण नोंदणी नुसार उसाचे गाळप होत नाही, या बागेश्वरी साखर कारखान्याच्या मनमानी जाचक अटी व शर्ती निर्माण करून त्याची पूर्तता करण्यात या भागातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाग पाडत आहे, म्हणून मा. साखर आयुक्त यांच्या मार्फत समिती नेमणूक बागेश्वरी साखर कारखान्याची चौकशी झाली पाहिजे, या वर्षी परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१ प्रति टन ऊसाला भाव दिला पाहिजे, कारण मागच्या वर्षी बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुकीच्या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रितसर जनहितार्थ तक्रार करण्यात आली होती, परंतु कारखान्याच्या दंडेल शाही विरोधात कारवाई झाले किंवा नाही, या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्ष म्हणून कोणतीही लेखी माहिती मिळालेली नाही, परंतु बागेश्वरी साखर कारखाना एफ. आर. पी नुसार उसाची रिकवरी बघून बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ३ हजारापेक्षा अधिक भाव दिला पाहिजे, तसेच महाराष्ट्र शासनाच्या जी.आर नुसार १४ दिवसाच्या आत या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी पैसे दिले पाहिजे, बागेश्वरी साखर कारखान्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, हि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे. जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथील श्रद्धा सुगर एनर्जी मॉ बागेश्वरी साखर कारखान्याने मागच्या वर्षी प्रोग्राम प्रमाणे २ महिने उशिराने ऊस गाळप केला होता, या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊन नुकसान झाले होते, परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप नोंद घेऊन उसाचे गाळप करण्यासाठी तसेच आम्हाला उसाचे पैसे ३ टप्प्यात द्या असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने सहमती पत्र व उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याची यंत्रणा लिहून घेत आहेत, तसेच मागच्या २ वर्षात ऊस नोंद लागवड करून घेण्यासाठी बागेश्वरी साखर कारखान्याने एकरी १० हजार रुपये घेतलेले साखर कारखान्याने परत दिले नाहीत, कारण या बाबत बागेश्वरी साखर कारखान्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही, म्हणून या बागेश्वरी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात यावी शेवटी निवेदनात असेही म्हटले आहे,
योग्य वेळेत कारवाई न झाल्यास उपविभागीय अधिकारी परतुर कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी…
Users Today : 34